मुंबई : कोरोनाच्या ओमायक्रॉन (omicron) या नव्या प्रकाराचा जगावर धोका बळावला आहे. प्रत्येक दिवस हा चिंता वाढवणारा ठरत आहे. कारण रुग्णांची संख्या दररोज वाढत चालली आहे. देशात सध्याच्या स्थितीला ओमायक्रॉनचे 415 प्रकरणं समोर आली आहेत. वाढते प्रकरण लक्षात घेता सरकारला पुन्हा एकदा नव्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. (Omicron cases increase in india)
देशात सध्या 17 राज्यांमध्ये हा व्हायरस (Omicron in 17 states) पोहोचला आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये रुग्ण अधिक आहेत. त्यातच ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षाचं सेलिब्रेशन (New Year Celebration) यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचं आव्हान आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर अनेक राज्यांनी बंदी घातली आहे. अनेक राज्यात रात्रीची जमावबंदी लागू झाली आहे.
केंद्र सरकारही अलर्ट झाली आहे. वाढता धोका पाहता सरकारने लवकरात लवकर लसीकरणावर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. ज्या राज्यांमध्ये लसीकरणाचं प्रमाण कमी आहेत अशा राज्यांना ही सूचना देण्यात आल्या आहेत.
केरळ, महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, मिझोरम, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पंजाबमध्ये केंद्राची टीम जाणार आहे. मंत्रालायाच्या माहितीनुसार, येत्या 3 ते 5 दिवसात या टीम राज्यांमध्ये दाखल होतील. राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांसोबत ही टीम काम करणार आहे.
WHO च्या वैज्ञानिकांनी इशारा दिलाय की, जर कोरोनाच्या नियमांचं पालन झालं नाही तर स्थिती अत्यंत बिकट होण्याची शक्यता आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग झपाट्याने होत असल्याने जगासमोर आता नवं संकट उभं राहिलंय.