Business Idea : कमी पैशात घरी बसून करा हा व्यवसाय, लाखो कमवाल; सरकार 50 टक्क्यांपर्यंत करेल मदत

Best Business Idea: जर तुम्ही तुमच्या नोकरीला कंटाळले असाल किंवा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक छान कल्पना घेऊन आलो आहोत. 

Updated: Sep 23, 2021, 10:11 AM IST
Business Idea : कमी पैशात घरी बसून करा हा व्यवसाय, लाखो कमवाल; सरकार 50 टक्क्यांपर्यंत करेल मदत  title=
संग्रहित छाया

मुंबई : Best Business Idea: जर तुम्ही तुमच्या नोकरीला कंटाळले असाल किंवा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक छान कल्पना घेऊन आलो आहोत. या व्यवसायाच्या कल्पनेने (Best Business Idea) तुम्ही दरमहा लाखो रुपये कमवू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, सरकारकडून 50 टक्के सबसिडी उपलब्ध आहे  (take 50% subsidy). हा विशेष व्यवसाय मोती शेतीचा असेल. सीप अर्थात ऑयस्टर (Oyster) आणि मोत्यांच्या व्यवसायावर  (Pearl farming) लोकांची आवड वाढली आहे आणि बरेच लोक त्यातून भरपूर कमाई देखील करत आहेत.

अशा प्रकारे आपण व्यवसाय सुरू करू शकता

हा व्यवसाय करण्यासाठी तीन गोष्टींची गरज आहे, या आहेत - एक तलाव, ऑयस्टर (Oyster) (ज्यातून मोती तयार केले जातात) आणि प्रशिक्षण. यात सर्वात महत्वाचे तलाव आहे. जो तुम्ही स्वतः खोदू शकता, याशिवाय, सरकार यासाठी 50 टक्के सबसिडी देखील देते. ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे ऑयस्टर, जी भारतातील अनेक राज्यांमध्ये आढळतात. दक्षिण भारत आणि बिहारमधील दरभंगाच्या ऑयस्टरची गुणवत्ता चांगली असली तरी. त्याच्या प्रशिक्षणासाठी देशात अनेक संस्था देखील आहेत. आपण मोती शेतीचे प्रशिक्षण मध्य प्रदेशातील होशंगाबाद आणि मुंबई येथून घेऊ शकता.

मोत्यांची शेती कशी करावी?

मोत्यांची लागवड करण्यासाठी, ऑयस्टर (Oyster) जाळ्यात बांधून 10 ते 15 दिवस तलावामध्ये ठेवले जातात, जेणेकरून ते स्वतःचे वातावरण निर्माण करू शकतील. यानंतर, ऑयस्टर बाहेर काढून त्यांची सर्जरी केली जाते. या सर्जरीत ऑयस्टरच्या आत एक साचा घातला जातो. या साच्यावर लेप केल्यानंतर, ऑयस्टर लेयर बनवले जाते, जे नंतर मोती बनते.

इतका खर्च येईल

एक ऑयस्टर तयार करण्यासाठी 25 ते 35 रुपये खर्च येतो. एका सीपमधून 2 मोती बाहेर येतात. जर आपण त्यांच्या किंमतीबद्दल बोललो तर एक मोती सुमारे 120 ते 200 रुपयांना विकला जातो. जर ते चांगल्या दर्जाचे असेल तर ते 200 रुपयांपेक्षा जास्त दराने विकले जाऊ शकतात. या व्यवसायाला प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेद्वारे  (Pradhan Mantri Matsya Sampada Yojna) मदत केली जाते.

लाखो रुपयांची होईल कमाई 

मोती शेतीतून लाखो रुपयांची कमाई करता येते. मोती  लागवडीसाठी, जर तुम्ही एक एकर तलावामध्ये 25000 सीपिया  (Oyster) टाकली, तर त्यासाठी सुमारे 8 लाख रुपये खर्च येतो. यातील काही ऑयस्टर देखील खराब होऊ शकतात. पण तरीही 50 टक्क्यांपेक्षा जास्त ऑयस्टर सहज बाहेर येतात. एका मोत्याची किंमत सुमारे 120 ते 200 रुपये आहे. त्यानुसार, सर्व खर्च वजा केल्यानंतर हा व्यवसाय 30 लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न सहज मिळवू शकतो.