लगेचच वाचा हे नवे नियम; नाहीतर बंद होतील Netflix, DTH सेवा

तर तुमच्यासाठीही बातमी महत्त्वाची आहे

Updated: Sep 23, 2021, 10:34 AM IST
लगेचच वाचा हे नवे नियम; नाहीतर बंद होतील Netflix, DTH सेवा  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

नवी दिल्ली : जर तुम्ही Netflix, DTH किंवा तत्सम काही सुविधांचा वापर करत आहात, तर तुमच्यासाठीही बातमी महत्त्वाची आहे. कारण, दुर्लक्ष केल्यास या सेवा बंदही होऊ शकतात. कारण ठरतंय ते म्हणजे आरबीआयचे नवे नियम. या सेवांसाठी तुम्ही बिल भरतेवेळी अथवा रिचार्ज करतेवेळी ऑटो पेमेंट्स या पर्यायाचा वापर करत आहात तर आता यापुढे तुम्हाला RBI च्या आदेशांचं पालन करणं अनिवार्य असेल. 

काय आहेत नवे आदेश? 
RBI च्या नव्या आदेशांनुसार डेबिट, क्रेडिट कार्ड, यूपीआय किंवा कोणत्याही पीपीआय म्हणजेच प्रीपेड पेमेंट इंन्स्ट्रुमेंटचा वापर करत असाल तर या व्यवहारासाठी आतापासून एएफए म्हणजेच अॅडिशनल फॅक्टर ऑथेंटिकेशनची गरज लागणार आहे. किंबहुना हे अनिवार्य असेल. 

ऑक्टोबरपासून लागू होणार नवे नियम
ऑटो पेमेंटसाठी आरबीआयनं अनेक नवे नियम सादर केले आहेत. जे ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. या नियमांअंतर्गत अनेक बँकांनी त्यांच्या उपभोक्त्यांना आणि खातेधारकांना सूचित करण्यासही सुरुवात केली आहे. त्यामुळं तुम्हीही नेटफ्लिक्स किंवा डीटीएच या आणि यासारख्या सेवा वापरत असाल तर तुम्हालाही हे नियम जाणून घेणं गरजेचं ठरत आहे. 

अॅडिशनल फॅक्टर ऑथेंटिकेशनचे नवे नियम 
- 1 ऑक्टोबरपासून अॅडिशनल फॅक्टर ऑथेंटिकेशनशिवाय क्रेडिट आणि डेबिट कार्डचा कोणताही व्यवहार पुढे जाणार नाही. 
- बँकांनी सांगितल्यानुसार मॉडिफिकेशन, रजिस्ट्रेशन आणि कोणत्याही सेवेला रद्द करण्यासाठीही तुम्हाला अॅडिशनल फॅक्टर ऑथेंटिकेशनची गरज लागणार आहे. 
- युजर्सना ऑटो पे डेबिटनं 24 तास आधीच प्री - डेबिट नोटीफिकेशनचा एसएमएस किंवा ईमेल मिळेल. यामध्ये तुम्हाला एक लिंक दिली जाईल ज्यातून ट्रांझॅक्शन, मँडेटमधून तुम्ही ऑप्ट आऊटही करु शकता. 
- तुम्ही कोणत्याही स्थायी आदेशाला मॉडिफाय, रद्द किंवा व्ह्यू करु शकता. 
- यासाठी तुम्ही कार्डवर Maximum Limit Fixed सुद्धा करु शकता. 
- Maximum Limit Fixed पेक्षा जास्तीचा व्यवहार असेल, तर यासाठी प्री डेबिट लिंकमध्ये एएफएसाठी वेगळी लिंक असेल. प्रत्येक वेळी 5 हजारहून जास्तीच्या रिकरिंग ट्रांझॅक्शनसाठी एएफएची गरज असेल.