Overtake वरुन राडा! कारचा घरापर्यंत पाठलाग केला अन्...; धक्कादायक Videos आले समोर

Bengaluru Road Rage: या घटनेसंदर्भातील 2 धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशलम मीडियावर व्हायरल झाले असून हे व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित आरोपींवर कारवाई करण्याची मागणी होताना दिसत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 14, 2023, 04:50 PM IST
Overtake वरुन राडा! कारचा घरापर्यंत पाठलाग केला अन्...; धक्कादायक Videos आले समोर title=
हे दोन्ही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत

Bengaluru Road Rage: बंगळुरुमधील रस्त्यावरील दादागिरीचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ट्वीटरवरील 'घर के कलेश' आणि 'अर्जून' या हॅण्डलवरुन या घटनेसंदर्भातील 2 वेगवेगळे व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत. एका व्हिडीओमध्ये रस्त्यावर ओव्हर टेक करण्यावरुन झालेल्या वादाचा घटनाक्रम आहे तर दुसऱ्यामध्ये याच वादातून अगदी घरापर्यंत कारचा पाठलाग करत इमारतीच्या गेटजवळ कारची तोडफोड करण्यात आल्याचं दिसत आहे. यापैकी एक व्हिडीओ धावणाऱ्या कारच्या डॅशबोर्डवरुन तर दुसरा सीसीटीव्हीमधील आहे.

नेमकं घडलं काय?

झालं असं की, रस्त्यावरुन वेड्यावाकड्या स्टाइलने दुचाकी चालवत काहीजणांनी रस्ता आडवून ठेवला होता. हे दुचाकीस्वार कोणालाही पुढे जाऊ देत नव्हते. त्यामुळे या कारचालकाने हॉर्न वाजवून या लोकांना रस्त्या देण्यासाठी सूचित केलं. मात्र काही अंतरावर जाऊन हे दुचाकीस्वार थांबले आणि आपल्या बाईकवरुन उतरले. नंतर या कारकडे चालत येत त्यांनी दमदाटी आणि आरडाओरड करण्यास सुरुवात केली. हे लोक कारकडे येताना पाहून चालकाने कार रिव्हर्स घेतली आणि तिथून काढता पाय घेतला. कारचालकाने लगेच गाडी रिव्हर्स घेतली आणि तिथून पळ काढल्याचं याच कारमधून शूट करण्यात आलेल्या व्हिडीओत दिसत आहे. मात्र हा सारा प्रकार नेमका कुठे घडला याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. मात्र हा प्रकार 13 जुलै रोजी घडल्याचं डॅशबोर्डवरील कॅमेरातून स्पष्ट होत आहे.

घरापर्यंत केला पाठलाग अन् नंतर...

मात्र हुल्लडबाजी करणाऱ्या या दुचाकीस्वारांना या चालकाने हटकल्याने त्यांनी या कारचा पाठलाग सुरु केली. हा कारचालक बराच अंतर गेल्यानंतरही हे त्याचा पाठलाग करत राहिले. या दुचाकीस्वारांनी बऱ्याच दूरपर्यंत या कारचा पाठलाग केला. पाठलाग करताना हे दुचाकीस्वार अगदी या कारचालकाच्या इमारतीपर्यंत आले. अखेर ही व्यक्ती त्याच्या इमारतीच्या गेटमधून आत शिरत असताना पाठलाग करत येणाऱ्या या दुचाकीस्वारांनीही गाड्या थांबवल्या. ही कार गेटमधून आत शिरण्याच्या आधीच या दुचाकीस्वारांनी गाडीची तोडफोड केली. एकाने साईड मीरर तोडले, एकाने खिडकीच्या काचा तोडल्या. इमारतीच्या सीसीटीव्हीमध्ये हा सर्व घटनाक्रम कैद झाला आहे. 

लोकांनी व्यक्त केला संताप

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांनी तातडीने या आरोपींना अटक करावी अशी मागणी केली आहे. अनेकांनी अशाप्रकारे कारचालकांना फसवलं जातं असं अनेकांनी कमेंट करुन म्हटलं आहे. हा संपूर्ण प्रकार फारच धक्कादायक असून अशाप्रकारे दिवसाढवळ्या सर्वासामान्यांवर हल्ले होत असतील तर पोलिस काय करत आहेत असा संतप्त सवालही अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट करुन विचारला आहे. या व्हिडीओंना हजारोंच्या संख्येनं व्ह्यूज मिळाले आहेत.