तिचं नाव काय, ती कोणत्या बॅचची इथपासून सर्वच माहिती शोधण्यासाठी नेटकरी करतायत प्रयत्न....

पल्लवी जाधव जालन्यातल्या महिला सुरक्षेसाठी नेमलेल्या दामिनी पथकाचं नेतृत्व करत आहे.

Updated: May 18, 2022, 05:44 PM IST
तिचं नाव काय, ती कोणत्या बॅचची इथपासून सर्वच माहिती शोधण्यासाठी नेटकरी करतायत प्रयत्न....  title=

मुंबई : आज काल सर्वच लोक सोशल मीडियावर सक्रीय असतात. मग यामध्ये सर्वसामान्य लोक असो, सेलिब्रिटी असो किंवा सरकारी खात्यातील कोणी व्यक्ती असतो. सर्वच आपलं पर्सनल अकाउंट मेंटेन करतात. सध्या फक्त सेलिब्रिटीच नाही तर रिअर हिरो आएएस, पीएसआय आणि आयपीएस यांच्याकडे देखील लोक कुतुहलाने पाहातात. अशीच एक औरंगाबादची पीएसआय सध्या चर्चेत आली आहे.

औरंगाबादची पीएसआ पल्लवी जाधव (@psi_pallavi_jadhav)  सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. तेथे लोकांनी तिला 'ब्यूटी विथ खाकी' अशी पदवी देखील दिली आहे. पल्लवी देखील आपल्या फोटोने लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेते.

सध्या पल्लीवी जाधव पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती म्हणजे तिच्या लग्नामुळे, पल्लीवीच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

रविवारी 15 मे 2022 रोजी पल्लवी जाधव आणि कुलदीप हे लग्न बंधनात अडकले. पल्लीवीने त्यांच्या या खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले, ज्यानंतर सर्वत्र चर्चा सुरु झाली. एवढंच काय तर सर्वच लोक पल्लीवीला शुभेच्छा देखील देऊ लागले आहेत.

लग्नाच्या या फोटोमध्ये देखील पल्लवी फारच सुंदर दिसत आहे. सफेद रंगाची साडी आणि तिची हेवी ज्वेलरी सर्वांचेच लक्ष वेधत आहेत.

पल्लवी ही मुळची औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावची आहे. तिला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं, ज्यासाठी तिने प्रयत्न देखील केले, परंतु परिस्थीतीमुळे मात्र तिला ते शक्य झालं नाही.

कारण सामान्य घरातून येत असल्यामुळे कमवा आणि शिका​हेच तिच्यासाठी शक्य होतं, ज्यानंतर  2015 साली 80 टक्के गुण मिळवून तिने एम ए मानसशास्त्र विषयाची पदवी मिळवली. याच वर्षी दुसऱ्या प्रयत्नात तिने पीएसआय परीक्षेत देखील​यश मिळवलं.

पल्लवी जाधव जालन्यातल्या महिला सुरक्षेसाठी नेमलेल्या दामिनी पथकाचं नेतृत्व करत आहे.

पीएसआय बनण्यापर्यंतचा पल्लवीचा प्रवास काही सोपा नव्हता. कारण इतरांचेही टोमणे तिला त्यावेळी ऐकायला लागायचे. मात्र याकडे दूर्लक्ष करत. पल्लवी आपल्या कामावर लक्षकेंद्रित करत गेली आणि तिला यश मिळाले देखील. तिचं हे यश त्या सर्वासाठी एक मोठी चपराक आहे, ज्यालोकांनी तिला खूप त्रास दिला होता.