सावधान! तर बूस्टर डोस तुम्हाला चांगलाच महागात पडेल; फेक कॉलपासून जपून...

ऑनलाइन फसवणुक करण्यासाठी सायबर क्रिमिनल्स रोज नवे डावपेच करून लोकांना अडकवत असतात.

Updated: Jul 16, 2022, 08:12 PM IST
सावधान! तर बूस्टर डोस तुम्हाला चांगलाच महागात पडेल; फेक कॉलपासून जपून...  title=

मुंबईः हल्ली ऑनलाईन फ्रॉडचे केसेस वाढू लागले आहेत त्यातून आता प्रत्येक साईटवरून डेटाही लगेचच मिळतो. अशा वेळी आपला डेटा सुरक्षित ठेवणं गरजेचे असतेच पण त्याहीपेक्षा आपण अशावेळी काय करायला हवे हेही समजून घेणे महत्त्वाचे असते. ऑनलाइन फसवणुक करण्यासाठी सायबर क्रिमिनल्स रोज नवे डावपेच करून लोकांना अडकवत असतात.

केंद्र सरकारने कोरोनाचा बूस्टर डोस मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे लोकं जास्तीत जास्त बुस्टर डोस घेण्याकडे वळले आहेत. ही चांगली गोष्ट असली तरी तूम्ही आता अधिक सावधान व्हा... कारण या घोषणेच्या फायद्याचा गैरवापर करून काही सायबर क्रिमिनल्स एक्टिव झाले आहेत. 

कोरोना बूस्टर डोस मोफत मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांना आता सायबर फसवणुकीचे शिकार बनवले जात आहे. फेक कॉल करून लोकांच्या बॅंक अकाऊंटमधून हे क्रिमिनल्स पैसे चोरत आहेत. 

सायबर क्रिमिनल लोकांना फोन करतो आणि म्हणतो की मी आरोग्य विभागातून बोलत आहे. यानंतर तो त्यांना विचारतो, तुम्हाला कोरोनाचे दोन्ही डोस मिळाले आहेत? तुम्ही 'हो' म्हणताच, तो फेक कॉलर तुम्हाला सांगेल, 'सर, तुम्हाला कोरोनाचा बूस्टर डोस लावावा लागेल. यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. मी तुमची नोंदणी करत आहे. यासाठी, तुमचा OTP (One Time Password) येताच आम्हाला कळवा. यानंतर तुम्हाला कम्फर्मेशनसाठी एसएमएस पाठवला जाईल, असे बोलून ती व्यक्ती फोन डिस्कनेक्ट करते. त्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून भोळे लोक विचार न करता त्या नंबरवर ओटीपी पाठवतात. त्यानंतर एसएमएस येतो की तूमच्या अकांऊटमधून थेट पैसेच गायब झाले आहे.

सायबर क्राईमची तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक 1930 जारी करण्यात आला आहे. याद्वारे तूम्ही फसवणुकीची ऑनलाइन तक्रार दाखल करू शकतात. सायबर क्राईमची तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही https://sp.cbr-mah@gov.in, https://ig.cbr-mah@gov.in आणि https://cybercrime.gov.in वर मेल करू शकता. याशिवाय, तुम्ही 022-22160080 किंवा 9820810007 वर कॉल करू शकता आणि @mumbaipolice आणि @cpmumbaipolice ट्विट करून मदत मिळवू शकता.