Lalit Modi daughter: ललित मोदी यांची मुलगी ही चर्चेत, जाणून घ्या काय करते आलिया मोदी

कोण आहे ललित मोदी यांची मुलगी आलिया.

Updated: Jul 16, 2022, 05:30 PM IST
Lalit Modi daughter: ललित मोदी यांची मुलगी ही चर्चेत, जाणून घ्या काय करते आलिया मोदी title=

मुंबई : आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी आणि बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या चर्चेत आहेत. 14 जुलै रोजी ललित मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपल्या आणि सुष्मिता सेनच्या नात्याची घोषणा केली. ललित मोदींनी सुष्मितासोबतचे काही रोमँटिक फोटो देखील शेअर केले होते. जे खूपच व्हायरल झाले आहेत.

ललित मोदींच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. ललित मोदी यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलीचं नाव आलिया आणि मुलाचं नाव रुचिर आहे. ललित मोदींची मुलगी आलिया सौंदर्याच्या बाबतीत ही अनेकांना टक्कर देतेय.

आलिया ही लंडनमध्ये इंटिरियर डिझायनर आहे आणि एका डिझाईन कन्सल्टन्सी कंपनीची संस्थापक आहे. आलियाने यावर्षी लग्नगाठ बांधली आहे. ललित मोदींनी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आलिया तिच्या आईसारखी खूप सुंदर आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. आलियाने मे 2022 मध्ये व्हेनिसमध्ये ब्रेट कार्सनलसोबत लग्न केले होते. ललित मोदींनी आपल्या मुलीच्या प्रत्येक फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.