ती एक्टिंग नव्हती! त्याचा मृत्यू झाला होता..डान्सरचा स्टेजवर मृत्यू ... Video Viral

सर्वत्र आनंदी वातावरण होतं, पण 'त्या' व्याक्तीचा मात्र अखेरचा दिवस, डान्स करताना पुरुषाचा मृत्यू, Video पाहून बसेल धक्का

Updated: Sep 3, 2022, 01:47 PM IST
ती एक्टिंग नव्हती! त्याचा मृत्यू झाला होता..डान्सरचा स्टेजवर मृत्यू ... Video Viral title=

Bareilly Dance in UP : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक व्यक्ती वाढदिवसाच्या पार्टीत नाचत असताना अचानक खाली पडते, सुरूवातीला सर्वांना वाटतं की जमिनीवर पडून डान्स करत आहे. मात्र तो तसाच पडून राहिल्यावर सर्वांच्या लक्षात येतं की त्या व्यक्तिचा जाग्यावरच मृत्यू झालेला असतो. प्रभात कुमार असं संबंधित व्यक्तिचं नाव आहे. 

नेमकं काय घडलं?
प्रभात कुमार मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये डान्स करत होते. त्यावेळी तिथं आजूबाजूला असलेलं लोकंही त्यांच्या डान्सचा आनंद  घेत त्यांना प्रतिसाद देत होते. त्यानंतर प्रभात कुमार यांनीही काही आकर्षक स्टेप्स करून दाखवत उपस्थितांची मने जिंकून घेतलीत.

डान्स चालू असताना कोणीही विचार केला नसेल असं घडलं, काळाने प्रभात कुमार यांच्यावर झडप घातली. प्रभात कुमार डान्स करता करता   जमिनीवर कोसळतात. सुरूवातीला लोकांना वाटतं डान्सची स्टेप्स आहे. पडल्यावर अजिबात हालचाल करत नाहीत त्यानंतर सर्वजण त्यांच्याजवळ जातात. त्यानंतर उपस्थित लोकं त्यांना रूग्णालयात नेतात.

रूग्णालयात गेल्यावर डॉक्टर प्रभात कुमार यांना मृत म्हणून घोषित करतात. ज्या मित्राचा वाढदिवस असतो त्यांच्या घरी  शोककळा पसरते. प्रभात कुमार यांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी व्हिडीओ पाहून शोक व्यक्त केला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.