Banking and Other Rules Changes from 1st October 2022: सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यानंतर ऑक्टोबर महिना सुरू होईल. नवीन महिन्याच्या सुरुवातीला असे काही बदल होणार आहेत, जे तुमच्या खर्चाशी संबंधित आहेत. सरकारी पेन्शन योजना (APY) ते डिमॅट खात्याशी संबंधित नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होतील.
यासोबतच देशांतर्गत एलपीजी (LPG किंमत) च्या किमतीतही बदल होण्याची शक्यता आहे. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) क्रेडिट कार्डबाबतही मोठे बदल करणार आहे. (Banking and Other Rules Changes from 1st October 2022)
LPG Gas दरात वाढ?
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारी तेल कंपन्या एलपीजीच्या किमती सुधारतात. . गेल्या वेळी 1 सप्टेंबर रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आला नव्हता. मात्र व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली. सणासुदीचा हंगाम लक्षात घेता कंपन्या एलपीजीच्या किमतीत कपात करतील अशी अपेक्षा आहे.
Card Tokenisation चा फायदा काय?
1 ऑक्टोबरपासून पेमेंटचे नियम बदलणार आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवहारासाठी तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरता तेव्हा व्यवहार 16-अंकी कार्ड क्रमांक, कार्डची मुदत, सीव्हीव्ही आणि ओटीपी नमूद करावा लागतो. त्यानंतर व्यवहार पूर्ण होतो. जेव्हा कार्ड तपशील एन्क्रिप्टेड पद्धतीने संग्रहित केले जातात तेव्हा फसवणूक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. टोकनायझेशनमध्ये (Tokenisation) तुमच्या कार्डची माहिती एका पर्यायी कोडमध्ये रूपांतरित केली जाईल. या कोडच्या मदतीने पेमेंट करणे शक्य होणार आहे. देशभरातील सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालणे हे RBI टोकनायझेशन प्रणालीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
1 ऑक्टोबरपासून कार्डच्या बदल्यात पेमेंट कंपन्यांना जे पर्यायी कोड किंवा टोकन दिले जातील ते अद्वितीय असतील आणि तेच टोकन अनेक कार्डांसाठी काम करेल. टोकनायझेशन प्रणाली अंतर्गत, टोकन क्रमांक Visa, Mastercard आणि Rupay सारख्या कार्ड नेटवर्कद्वारे जारी केला जाईल. काही बँक कार्ड नेटवर्कला टोकन जारी करण्यापूर्वी बँकेकडून मंजूरी आवश्यक असू शकते. विशेष बाब म्हणजे या नव्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्याला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.
अटल पेन्शन योजनेच्या नियमात बदल
अटल पेन्शन (Atal Pension) योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना 5000 रुपयांपर्यंत मासिक पेन्शन मिळते. एक ऑक्टोबरपासून या योजनेत बदल होणार आहे. नव्या नियमांनुसार, आयकर भरणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही करदाते असाल तर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंतची संधी आहे. सध्याच्या नियमानुसार वय 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंतच्या वयाची कोणतीही व्यक्ती या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकते.
वाचा : पर्यटकांनी भरलेली बस खोल दरीत पडली; 7 ठार, 10 जखमी
डिमॅट अकाउंट
शेअर मार्केटमधील (share market) व्यवहारासाठी डिमॅट अकाउंट आवश्यक असते. अनेकजण शेअर बाजारात व्यवहार करतात. आता डिमॅट अकाउंटधारकांसाठी Two Factor Authentication करणे आवश्यक आहे. तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये Two Factor Authentication चा पर्याय 30 सप्टेंबरपर्यंत Enable करावा लागणार आहे. त्याशिवाय, तुम्हाला तुमचे डिमॅट अकाउंट (Demat account) सुरू करता येणार नाही.
रेपो दरात वाढ?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) पतधोरण आढावा बैठक येत्या आठवड्यात होणार आहे. रिझर्व्ह बँक 30 सप्टेंबर रोजी व्याज दर जाहीर करणार आहे. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून रेपो व्याज (Repo interest) दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जे महाग होणार आहेत.
Banking and Other Rules Changes from 1st October 2022 sz