मुंबई : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते. 'स्टेट बँक ऑफ इंडिया' अर्थात एसबीआयनं आपलं जाळं देशभरात पसरवण्यासाठी 'बँक मित्र' नेमणार असल्याचं जाहीर केलंय. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयला देशातील आठ राज्यांत बँक मित्रांची गरज आहे. तुम्हालाही इच्छा असेल तर तुम्हीही बँक मित्र बनू शकता.
गाव - खेड्यांत किंवा दुर्गम भागांत बँक सुविधा पोहचवण्यासाठी 'बँक मित्र' बनवले जातात. हे लोक बिझनेस करस्पॉडन्टप्रमाणेच काम करतात. लोकांचे नवीन बँक अकाऊंट उघडण्यापासून पैसे जमा करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी हे लोक मदत करतात. याशिवाय बँक मित्र इतर फायनान्शिअल प्रोडक्टही नागरिकांपर्यंत पोहचवू शकतात. देशात सध्या १.२५ लाख लोक बँक मित्र म्हणून काम करत आहेत. बँकेकडून त्यांना ठराविक रक्कमेचा पगारही मिळतो... जो सध्या २००० रुपयांपासून ५००० रुपयांपर्यंत आहे. इतकंच नाही तर प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर कमिशनही मिळतं.
बँक मित्र बनण्यासाठी उत्तरप्रदेशात ४३ जागांवर, महाराष्ट्रात २६१, बिहारमध्ये १८, दिल्लीत १२० तर छत्तीसगड २४, आसाम ६४, अरुणाचल प्रदेश १५ तर आंध्रप्रदेशमध्ये १६ जागांवर व्हॅकन्सी आहेत.
१८ वर्षांपेक्षा जास्त वय असणारी प्रत्येक व्यक्ती बँक मित्र बनू शकते. यामध्ये निवृत्त बँक कर्मचारी, निवृत्त शिक्षक, सेना निवृत्त जवान, निवृत्त सरकारी कर्मचारी, किराना किंवा मेडिकल स्टोअरचा मालक, पेट्रोल पंप मालक, एनजीओ आदिंचा समावेश होतो.
अधिक माहितीसाठी इथे संपर्क साधा - https://www.sbi.co.in/portal/web/agriculture-banking/business-correspond...