कामाची बातमी! ऑगस्टमध्ये देशभरात 13 दिवस बंद राहणार बँका, सुट्ट्यांची यादी पाहा

Bank Holiday In August 2023: ऑगस्ट महिन्यात 13 दिवस बँका बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेने याबाबत एक लिस्ट अपडेट केली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 31, 2023, 04:54 PM IST
कामाची बातमी! ऑगस्टमध्ये देशभरात 13 दिवस बंद राहणार बँका, सुट्ट्यांची यादी पाहा title=
Bank Holidays August 2023 Banks to remain closed on 13 days

Bank Holiday In August: रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियने बँकेच्या (RBI) ग्राहकांसाठी मोठी अपडेट दिली आहे. ऑगस्ट (August) महिन्यात 14 महिने बँका बंद राहणार आहात, आरबीआयकडून ग्राहकांना हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ग्राहकांचे बँकेसंबंधीत काही कामे असतील ती हे 14 दिवस वगळताच करुन घ्या,असंही अवाहन आरबीआयकडून करण्यात आलं आहे. आरबीआय वेळोवेळी बँका संबंधित काही अपटेड जारी करत असतात. आताही आरबीआयने बँकांना असलेल्या सुट्टयांची यादी जारी केली आहे. 

ऑगस्ट महिन्यात देशातील वेगवेगळ्या राज्यात सण साजरे करण्यात येत आहे. देशातील एकूण राज्यांतील सुट्ट्यांचा आकडा हा 14 इतका आहे. इतकेंच नव्हे तर काही लाँग विकेंडदेखील येणार आहे. आरबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुसरा आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. ऑगस्ट महिन्यात कोणतेही कामकाज करताना करताना सुट्ट्यांच्या यादीवर एकदा नजर टाकाच. 

ऑगस्ट महिन्यात कोणत्या दिवशी बँका बंद राहणार 

6 ऑगस्ट रोजी रविवारी असल्याने बँक बंद असणार आहेत. 
8 ऑगस्ट रोजी गंगटोकमध्ये तेन्दोंग ल्हो रम फात या कारणामुळं बँकेला सुट्टी असेल
12 ऑगस्ट रोजी दुसऱ्या शनिवारी बँका पूर्ण देशात बंद असणार आहेत.
13 ऑगस्ट रोजी रविवार असल्याने बँकेला सुट्टी असेल
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन असल्याने बँकांना सुट्टी असेल
16 ऑगस्ट रोजी पारसी नववर्ष असल्याने मुंबई, नागपूर आणि बेलापूरमध्ये बँकांना सुट्टी असेल.
18 ऑगस्ट रोजी श्रीमंत शंकरदेव तिथीमुळं गुवाहाटीमध्ये बँका बंद असतील.
20 ऑगस्ट रोजी रविवार असल्याने बँका बंद असणार आहेत
26 ऑगस्ट रोजी चौथा शनिवार असल्याने संपूर्ण देशात बँका बंद असतील 
27 ऑगस्ट रोजी रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल
28 ऑगस्ट रोजी ओणममुळं कोच्चि आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद असतील
29 ऑगस्ट रोजी तिरुओणममध्ये कोच्चि आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहतील
30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळं जयपूर आणि शिमलामध्ये बँकांना सुट्टी असेल. 
31 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन /श्री नारायण गुरु जयंती/पंग-लहबसोलमुळं देहरादून, गंगटोक, कानपुर, कोच्चि,लखनऊ आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद असणार आहेत. 

ऑफिशिअल लिंक पाहा 

बँकाच्या सुट्टीविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ऑफिशिअल वेबसाइटला भेट देऊ शकतात. इथे तुम्हाला प्रत्येक महिन्याला प्रत्येक राज्यातील सुट्ट्यांविषयी माहिती मिळणार आहे. 
https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx

मोबाइल बँकेचा वापर करा 

ऑगस्ट महिन्यातील सुट्ट्यांमुळं तुमच्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून तुम्ही मोबाईल किंवा नेट बँकिगचा आधार घेऊ शकता. पण एटीएममधून रोख रक्कम काढताना तुम्हाला अडचण येऊ शकते. सुट्ट्यांच्या आधीच रक्कम काढून ठेवणे फायद्याचे ठरेल.