बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांना भ्रष्टाचार प्रकरणी ५ वर्ष जेल

ढाक्याच्या न्यायालयानं त्यांना 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावलीय. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 8, 2018, 04:57 PM IST
बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांना भ्रष्टाचार प्रकरणी ५ वर्ष जेल title=

ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्या खलिदा झिया यांना भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलंय. ढाक्याच्या न्यायालयानं त्यांना 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावलीय. 

अडीच लाख अमेरिकन डॉलर्सचा गैरव्यवहार

झिया दत्तक ट्रस्टसाठी विदेशातून मिळालेल्या 21 दशलक्ष टका म्हणजे सुमारे अडीच लाख अमेरिकन डॉलर्सच्या रकमेत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत 72 वर्षांच्या झिया यांना ही सजा सुनावण्यात आलीय. त्यांचा मुलगा तारिक रहमान आणि आणखी चौघांना याप्रकरणी 10 वर्षांची सजा न्यायालयानं दिलीय. 

ट्रस्टला मिळालेल्या देणग्या झियांनी लाटल्या?

हा ट्रस्ट केवळ कागदावर अस्तित्वात असून, ट्रस्टला मिळालेल्या देणग्या झियांनी लाटल्याचा आरोप आता सिद्ध झालाय. 2001 ते 2006 या काळात त्या बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या.