हैद्राबाद : आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या फ्रेशर्संना कमी पगारात काम करावे लागते, याविरूद्ध आयटी उद्योगातील टी.व्ही. मोहनदास पै यांनी आवाज उठवला. त्याचबरोबर या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या इंजिनियर्सना कमी पगार मिळावा यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर इंफोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ति म्हणाले की, सॉफ्टवेयर उद्योगात आपल्या करिअरची सुरूवात करणाऱ्यांचे पगार गेल्या सात वर्षापासून सारखेच आहे. त्यात वाढ झालेली नाही. तर वरिष्ठांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात वाढ होते. मुर्ती यांच्या या म्हणण्याचे पै यांनी सर्मथन केले आहे.
इंफोसिस के पूर्व मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) पै यांनी सांगितले की, कंपन्या सॉफ्टवेअर इंजिनीयर्सच्या अधिक उपलब्धतेचा फायदा उचलत आहे आणि मार्केट नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. ही प्रवृत्ती अत्यंत चुकीची आहे.
त्याचबरोबर पै म्हणाले की, ही खरे आहे. यात काही शंका नाही. आयटी कंपन्या एकमेकांबरोबर चर्चा करतात. या चर्चेत वेतनात वाढ न करण्याचा देखील विचार केला जातो. हे खूप काळापासून चालत आले आहे.
पुढे ते म्हणाले, टॅलेंटच्या कमतरतेमुळे आयटी उद्योगातील लोकांचे पगार प्राथमिक स्तरात कमी असतात. मात्र मोठ्या कंपन्या चांगला पगार नक्कीच देऊ शकतात. तो खर्च त्यांना परवडणारा असतो. हा माझ्यासाठी एक नैतिक मुद्दा आहे. टीसीएस आणि इंफोसिससारख्या मोठ्या कंपन्यांना नव्या इंजिनर्सना चांगले पगार देण्यासाठी नेतृत्व केले पाहिजे.