मुंबई : एका भारतीय उद्योजकाच्या कंपनीने सरासरी दररोज २२ कोटी रुपयांचं दान केलं आहे. या उद्योजकाच्या कंपनीने सीएसआर फंडाच्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम समाज हिताच्या कामासाठी खर्च केली आहे. भारतात कोणतीही कंपनी श्रीमंती अथवा फायद्याच्या बाबतीत नंबर एक असली, तरी दान आणि समाज हिताच्या कामासाठी खर्च करण्याच्या बाबतीत अझीम प्रेमजी नंबर एकवर आहेत.
अझीम प्रेमजी यांनी वर्षभरात आपल्या संपत्तीतून ७ हजार ९०४ कोटी रुपये दान केले आहेत. ह्यूरन इंडियाने सर्वात दानशूर व्यक्तींची यादी तयार केली आहे. यात नंबर एकवर आहेत विप्रोचे सर्वेसर्वा अझीम प्रेमजी.
भारतातने कोरोनाविरुद्ध दिलेल्या लढ्यासाठी अझीम प्रेमजी यांनी आर्थिक हातभार लावला आहे. अझीम प्रेमजी यांनी कोरोनाच्या लढ्यासाठी १ हजार १२५ कोटी रुपये दान केले आहेत. ही रक्कम विप्रो कंपनीच्या सीएसआर आणि समाजहितासाठी केल्या जाणाऱ्या खर्चापेक्षा जास्त आहे.
एचसीएल कंपनीचे शिव नादर हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. शिव नादर यांनी सामाजिक कामासाठी ७९५ कोटी रुपये दान केले आहेत. तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी आणि आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे दान करण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
रिलायन्सने ३० मार्च रोजी पीएम केअर फंडासाठी ५०० कोटी रुपयांची मदत केली होती. तसेच गुजरात आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देखील प्रत्येकी ५ कोटी रुपयांची मदत केली होती.