'आयुष्मान भारत स्कीम'ची लॉन्च डेट ठरली, सरकारी कर्मचार्‍यांचा सुट्ट्याही रद्द

15 ऑगस्टला लाल  किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'आयुषमान भारत' स्कीमची घोषणा केली होती. 

Updated: Aug 27, 2018, 10:57 AM IST
'आयुष्मान भारत स्कीम'ची लॉन्च डेट ठरली, सरकारी कर्मचार्‍यांचा सुट्ट्याही रद्द  title=

मुंबई : 15 ऑगस्टला लाल  किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'आयुषमान भारत' स्कीमची घोषणा केली होती. आता या स्कीमचा लवकरात लवकर देशवासियांना फायदा घेता यावा याकरिता तयारी सुरू झाली आहे. महिन्याभराहून कमी वेळात ही स्कीम लॉन्च करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वास्थ्य मंत्रालयातील कर्मचार्‍यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

मोदींची महत्त्वाकांक्षी योजना - 

जगातील सर्वात मोठ्या सरकारी स्वास्थ्य वीमा योजनेला 25 सप्टेंबरला लॉन्च करण्यात येणार आहे. या योजनेला वेळीच वास्तावात उतरवण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातून खास रिपोर्ट मागाण्यात आला होता. त्यासोबतच 29 ऑगस्टला यासाठी खास समिक्षा बैठक बोलावण्यात आली होती.  

मोदींच्या 'आयुषमान भारत स्कीम' वेळेत लॉन्च करण्यासाठी 15 संयुक्त सचिव आणि अतिरिक्त सचिव काम करत आहेत. 'जनआरोग्य योजना' 25 सप्टेंबरपासून लागू, कोट्यावधी भारतीयांसाठी महत्त्वाकांक्षी योजना

सुट्ट्या रद्द 

आयुषमान  भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदू भूषण यांनि दिलेल्या माहितीनुसार,  वेळेत स्कीम लॉन्च करण्यासाठी सार्‍या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच कर्मचारी सकाळी 9 ते रात्री 9 अशा वेळेत काम करत आहेत. 25 सप्टेंबरपर्यंत सार्‍या अधिकार्‍यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

ओडिसाचा नकार 

नरेंद्र मोदींच्या 'आयुषमान भारत स्किम' द्वारा 10.5 कोटी परिवारातील सुमारे 55 कोटी लोकांना त्याचा फायदा होणार आहे. सध्या ओडिसा राज्याने या योजनेमध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.