उद्योपगपती मुकेश अंबानी सहकुटुंब अयोध्येत, दान केले तब्बल 'इतके' कोटी रुपये

Ram Mandir : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स समूहाचे मालक मुकेश अंबानी यांनी सहकुटुंब अयोध्येत हजेरी लावली. रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अंबांनी कुटुंब उपस्थित होतं. यावेळी मुकेश अंबानी यांनी अयोध्या मंदिरासाठी भरभरुन दानही केलं.

Updated: Jan 22, 2024, 07:51 PM IST
उद्योपगपती मुकेश अंबानी सहकुटुंब अयोध्येत, दान केले तब्बल 'इतके' कोटी रुपये  title=

Ram Mandir : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मोदींनी गर्भगृहात विधिवत पूजा केली. महाराष्ट्रातल्या पुरोहितांसह देशभरातल्या पुरोहितांच्या मंत्रोच्चारात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतल्या मंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा केली. विधिवत पूजा झाल्यानंतर मोदींनी रामाच्या चरणी फुलं वाहिली. त्यानंतर पंतप्रधानांनी राममूर्तीची पंचारती ओवाळून आरती केली. मंदिरातले मुख्य उपचार पार पडल्यानंतर मोदींनी रामाच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालत रामासमोर साष्टांग नमस्कार घालून नमन केलं. 

अंबानी कुटुंब अयोध्येत
या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज अयोध्येत उपस्थित होते. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स समूहाचे मालक मुकेश अंबानी  (Mukesh Ambani) यांनी सहकुटुंब अयोध्येत हजेरी लावली. मुकेश अंबानी यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी नीता अंबानी (Nita Ambani), मुलगी ईशा अंबानी, जावई आनंद पिरामल, मुलगा अनंत अंबानी, त्याची होणारी पत्नी राधिका मर्चंट, आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका अंबानी उपस्थित होते. अंबानी कुटुंबियांनी भगवान श्रीरामाचं दर्शन घेतलं. यावेळी संपूर्ण कुटुंब उत्साहित आणि आनंद दिसत होतं. 

मुकेश अंबानी आणि कुटुंबियांकडून राम मंदिर ट्रस्टला  2 कोटी 51 लाख रुपयांचं दान दिलं. भगवान श्रीराम आले आहेत, संपूर्ण देशात दिवाळी साजरी केली जात आहे. या क्षणाचा मी साक्षीदार आहे, मी सौभाग्यशाली असल्याचं मुकेश अंबानी यांनी यावेळी सांगितलं. तर नीता अंबानी यांनी जय श्रीराम म्हणत आजचा ऐतिहासिक दिवस आहे, भारतीय संस्कृतीचा आपल्याला गर्व असल्याचं सांगितलं.

तर मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी (Aakash Ambani) याने आजचा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंदवला जाईल असं सांगितलं. तर आजचा दिवस सर्वात पवित्र दिवसांपैकी एक असल्याचं ईशा अंबांनीने सांगितलं. ईशा अंबानीबरोबर (Isha Ambani)तिचा पती आनंद पिरामलही उपस्थित होता.  मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानीने प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन धन्य झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. अनंत अंबानीबरोबर त्याची होणार पत्नी राधिकदेखील उपस्थितहोती.

मुकेश अंबानी यांचे छोटे भाऊ अनिल अंबानी हे देखील अयोध्येत सोहळ्यासाठी उपस्थित होते. याशिवाय बिरला समुहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिरला (Aditya Birla Group chairman) हे मुलगी अनन्या बिरलासह अयोध्येत आले होते. याशिवाय विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज हा सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत उपस्थित होते.