नात्याला काळीमा! आत्याने भाचीला प्रियकराच्या मित्राकडे सोपवलं अन् स्वत: दुसऱ्या बेडवर प्रियकरासोबत...

Crime News : नात्याला काळीमा फासणारी घटनेने पोलीसही हादरले आहेत. स्वत:च्या अल्पवयीन भाचीला प्रियकराच्या मित्राकडे सोपवलं. मित्राने बळजबरीने भाचीवर लैंगिक शोषण केलं. आत्या मात्र प्रियकरासोबत दुसऱ्या बेडवर...

नेहा चौधरी | Updated: Oct 10, 2023, 04:56 PM IST
 नात्याला काळीमा! आत्याने भाचीला प्रियकराच्या मित्राकडे सोपवलं अन् स्वत: दुसऱ्या बेडवर प्रियकरासोबत... title=
aunty handed over the niece to the boyfriends friend sexual abuse and aunty other bed with the boyfriend Physical Relation

Crime News : आई वडिलांनंतर जवळची नाती असतात ती म्हणजे आजी आजोबा, मावशी, आत्या, मामा...आईनंतर मावशी आणि आत्या या सगळ्याच जवळच्या असतात. आत्या भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर नातेसंबंधावरील विश्वास काही वेळासाठी का होईना पण डगमगतो. आत्याने आपल्या अल्पवयीन भाचीला प्रियकराच्या मित्राकडे सोपवलं. त्या मित्राने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे आत्या त्याच रुममधील दुसऱ्या बेडवर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवत होती. (aunty handed over the niece to the boyfriends friend sexual abuse and aunty other bed with the boyfriend Physical Relation)

पोलिसांकडे तक्रार दाखल करताना पीडितीने या घटनेबद्दल सांगितलं. 3 ऑक्टोबरला पीडित मुलीची आत्या भावाला भेटण्यासाठी अमृतसरमध्ये आली होती. 4 ऑक्टोबरला भाऊ एका लग्नासाठी बाहेर गेला होता. घरात आत्या आणि 15 वर्षीय भाची एकटी होती. हीच संधी साधून आत्याने भाचीला अमृतसरमधील गुरुद्वाराला जाऊ असं सांगून घरातून बाहेर घेऊन गेली. पण गुरुद्वारामध्ये न जाता आत्या भाचीला एका हॉटेलमध्ये घेऊन आली. 

भाचीला काही कळत नव्हतं. हॉटेलमध्ये गेल्यावर आत्याचा प्रियकर आणि त्याचा मित्र तिथे एका रुममध्ये आधीपासून त्यांची वाट पाहत होते. आत्याने भाचीला प्रियकराच्या मित्राला सोपवलं.  हे सगळं पाहून भाचीला धक्का बसला. त्या रुममध्ये दोन बेड होते. तो भाचीला एका बेडवर घेऊन त्याच्यावर बळजबरी करु लागला. हे पाहूनही आत्याला संताप आला नाही. तर कहर म्हणजे आत्या दुसऱ्या बेडवर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवत होती. 

आत्याचा क्रूरतेपणामुळे हादरलेली भाची जेव्हा घरी पोहोचली तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. बहिणीचं कृत्य ऐकून भावाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी लगेचच पोलीस स्टेशन गाठलं आणि आत्यासह त्या नराधमाविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन आत्या राज कौर, आकाशदीप सिंग आणि अर्शदीप सिंग यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे.