Pornography : आतापर्यंत पॉर्नोग्राफीप्रकरणी सरकारनं अनेक पावलं उचलत काही कठोर निर्णय घेतले आहेत. पण, आता त्याहीपलीकडे जाऊन याचा एक नवा प्रकार पुन्हा एकदा बराच वापरात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. हे प्रकरण फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात चर्चेता विषय ठरत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हा प्रकार अमेरिकेमध्ये 2019 पासून अस्तित्वात आहे. (audio porn podcasts telling sex stories getting more response more apps are in trend )
हा प्रकार म्हणजे ऑडिओ पॉर्न. सध्याच्या घडीला पॉर्न व्हिडीओसोबतच हा प्रकार भारतातसुद्धा चर्चेत आला असून, त्यासाठीचे अॅप्स वापरणाऱ्यांची संख्यासुद्धा लक्षणीय प्रमाणात वाढल्याची माहिती समोर आली आहे. यात स्पॉटीफाय (Spotify) या अॅपचा वापर करक तिथं बोल्ड आणि इंटिमेट कंटेंटसंबंधी सर्च करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. इथं बोल्ड, सेक्शुअल आणि तत्सम प्रकारातील ऑडिओबाबत सर्च केलं जात आहे. यामध्ये भारतीयांची संख्या जास्त आहे.
सदर पॉडकास्ट, अर्थात ऑडिओ पॉर्नमध्ये नेमकं काय आहे आणि ते कोण ऐकू शकतं याविषयी स्पॉटीफायकडे कागदोपत्री माहिती आहे. पण, प्रत्यक्षात मात्र त्याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.
स्पॉटीफाय हे एक असं अॅप आहे, जिथं तुम्ही तुमचा आवडता कलाकार, त्यांची गाणी सर्च करून ती ऐकू शकता. आता इथं SEX STORIES अशा की वर्डनं बराच अडल्ट कंटेंट शोधला जात आहे.
कायद्याच्या चौकटीत राहून या प्रकरणाचा विचार करायचा झाल्यास कोणत्याही प्रकारचा अश्लील कंटेंट पॉर्न म्हणून गणला जातो. मग तो फोटो असो किंवा व्हिडीओ, अगदी टेक्स्ट किंवा ऑडिओचाही याच समावेश आहे.
स्पॉटीफाय, गाना, सावन, विंक हे आणि असे अनेक ऑडिओ स्ट्रीमिंट अॅप सध्या स्मार्टफोन युजर्सच्या वापरात आहेत. पण, तिथं ऑडिओ कंटेंटसोबतच अश्लील ऑडिओसुद्धा उपलब्ध करून दिल्या जात आहे. थोडक्यात इथं कुठेही IT Act चं उल्लंघन होत असल्याची तक्रार रितसर स्वरुपात दाखल केल्यास ही बाब कारवाईस पात्र आहे असं मत कायदे तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.