मुंबई : एकीकडे कॅशचा तुटवडा जाणवत असतानाच सामान्यांसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. आता एटीएमच्या वापरावर अधिक चार्ज द्यावा लागू शकतो. एटीएम ऑपरेटर्सने एटीएम ट्रान्झॅक्शनसाठी हायर इंटरचेंज रेटची मागणी केलीये. सध्या सर्वच बँका दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास ग्राहकांकडून १५ रुपये आणि दुसऱ्या नॉन कॅश ट्रान्झॅक्शनसाठी ५ रुपये दंड आकारतात. ५ ट्रान्झॅक्शननंतर हा चार्ज द्यावा लागकतो. मात्र या चार्जमध्ये वाढ करण्याची मागणी केली जातेय.
कन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री()CATMI) ची मागणी आहे की एटीएमच्या ट्रान्झॅक्शन चार्ज कमीत कमी ३ ते पाच रुपयांपर्यंत वाढवला पाहिजे. CATMIचे संचालक श्रीनिवास यांनी दिलेल्या माहितीनुसार आरबीआयने नुकतेच आपले नियम कडक केलेत.
आरबीआयच्या नव्या आदेशानुसार एटीएम सर्व्हिस प्रोव्हाडरसाठी ३०० कॅश व्हॅन, एक ड्रायव्हर, २ रक्षक आणि कमीत कमी २ गनमॅन असणे गरजेचे असते. याशिवाय कॅश घेऊन जाणाऱ्या सारी वाहने जीपीएस लेस असली पाहिजेत.
देशातील काही भागांमध्ये कॅशचा तुटवडा आहे. मात्र सरकार आणि आरबीआय म्हणतेय की देशात कॅशची कमतरता नाहीये. एसबीआयच्या रिसर्च रिपोर्टनुसार, मार्केटमध्ये जितकी कॅश असली पाहिजे. त्यामुळे सध्या चलनात असलेले 70,000 कोटी रुपये कमी आहेत. त्यामुळे हा तुटवडा भरुन काढण्यासाठी कमीत कमी दोन आठवडे लागतील. तसेच कॅशची कमतरता पूर्णपणे दूर होण्यासाठी सहा आठवडे लागू शकतात.