अटलबिहारी वाजपेयींना नेमका त्रास कशाचा ?

भारताचे माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयींची प्रकृती मागील 24 तासात खालावत असल्याने त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टिम्वर ठेवण्यात आल्याचे दिल्लीतील एम्स रूग्णालयाने एका मेडिकल बुलेटीनद्वारा जाहीर केले आहे. 

Updated: Aug 16, 2018, 10:00 AM IST
अटलबिहारी वाजपेयींना नेमका त्रास कशाचा ? title=

मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयींची प्रकृती मागील 24 तासात खालावत असल्याने त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टिम्वर ठेवण्यात आल्याचे दिल्लीतील एम्स रूग्णालयाने एका मेडिकल बुलेटीनद्वारा जाहीर केले आहे. त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी हॉस्पिटलला भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली. देशभरात अटलबिहारींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी याकरिता प्रार्थना करण्यात येत आहे. 

अटलबिहारी वाजपेयींना नेमका त्रास कशाचा ? 

मागील नऊ आठवड्यांपासून अटलबिहारी वाजपेयी दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल आहेत. त्यांना किडनी आणि युरीन इंफेक्शनचा त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शरीरातून मूत्रविसर्जनाच्या कार्यामध्ये अडथळा येत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

किडनीचा आजार 

93 वर्षीय अटल बिहारी वाजपेयी मधुमेही आहेत. सध्या त्यांची एकच किडनी काम करत आहे. 

गुडघेदुखीचा त्रास

2000 साली अटलबिहारींच्या गुडघ्यांवर मुंबईतील ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल्समध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये त्यांच्या गुडघ्यातील  वाटी बदलण्यात आली. कालांतराने त्यांच्या हालचालींवर बंधनं आली आहेत. 

स्ट्रोकचा आघात 

2009 साली अटलजींना स्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्या cognitive abilities म्हणजेच लोकांना ओळखण्याच्या कार्यावर परिणाम झाला. हळूहळू त्यांना विस्मृतीचा आजार जडला. या आजारपणात वाजपेयींनी त्यांचा अवाजही गमावला. त्यांचं बोलणं पूर्णतः बंद झालं आहे. 

2015 साली त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च सन्मान देण्यात आला. प्रकृती अस्वस्थ्यामुळे वाजपेयींना त्यांच्या राहत्या घरीच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.