LIVE UPDATE : अटलजींच्या निधनाने देशभरात शोककळा

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं निधन

Updated: Aug 16, 2018, 05:52 PM IST
LIVE UPDATE : अटलजींच्या निधनाने देशभरात शोककळा title=

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. मागच्या २४ तासात वाजपेयींची प्रकृती गंभीर झाल्याचे एम्सकडून जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटलं आहे. वाजपेयींवर ११ जूनपासून दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Live Update

5.45 PM : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन. संध्याकाळी 5 वाजून 05 मिनिटांनी घेतलं शेवटचा श्वास

4.00 PM : कैलास सत्यार्थी एम्स रुग्णालयात दाखल, वाजपेयींच्या प्रकृतीची केली विचारपूस

3.30 PM : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी एम्स रुग्णालयात पोहोचले.

2.30 PM : अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती अजूनही चिंताजनक

1.56 PM : पतंप्रधान नरेंद्र मोदी एम्स रुग्णालयात पोहोचले आहेत. सकाळपासूनच भाजपचे नेते आणि मंत्री रुग्णालयात पोहोचत आहेत. आतापर्यंत अनेक मंत्र्यांनी वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

12.15 PM : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया एम्स रुग्णालयात दाखल

12.05 PM : अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक, एनडी शाळेच्या विद्यार्थ्यांची वाजपेयींसाठी प्रार्थना 

11.55 AM : सरसंघचालक मोहन भागवत बंगळुरुहून दिल्लीला रवाना झाले आहेत.

11.50 AM : अनेक राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीला येण्याची शक्यता

11.45 AM : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपली यात्रा रद्द केली असून ते देखील थोड्याच वेळात दिल्लीला पोहोचणार आहेत. 

11.30 AM : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला जाणार आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री दुपारी 3 वाजता दिल्लीला रवाना होण्याशी शक्यता आहे.

दुसरीकडे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया हे देखील दिल्लीला रवाना झाल्या आहेत.

11.05 : रुग्णालयाकडून प्रेस रिलीज जारी करण्यात आली असून वाजपेयींची प्रकृती चिंताजनक असून ते लाईफ सपोर्ट सिस्टमवर असल्याचं यात म्हटलं आहे.

11.00 AM : अटल बिहारी वाजपेयी यांच्या शासकीय निवासस्थानाची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. स्पेशल फोर्सेस तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीची ट्रॅफीक देखील वळवली.

10.45 AM : एम्स रुग्णालय परिसरातील सुरक्षा वाढवली. दिल्ली पोलीस अनेक मोठे अधिकारी रुग्णालय परिसरात पोहोचले आहेत.

10.42 AM : यूपीचे उपमुख्यमंत्री दिनेश मौर्या यांना अश्रृ अनावर

10.40 AM : वाजपेयींच्या प्रकृतीची माहिती सर्वात आधी पंतप्रधान कार्यालयाला दिली जाणार

10.37 AM : भाजपने आजचे सर्व कार्यक्रम केले रद्द

10.35 AM : थोड्याच वेळात एम्सचे डॉक्टर मेडिकल बुलेटीन जारी करणार आहेत.

10.30 AM : भाजपचे अनेक मोठे नेते यावेळी रुग्णालयात उपस्थित

10.20 AM : भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि त्यांची मुलगी प्रतिभा आडवाणी एम्स रुग्णालयात दाखल

11.10 AM : गृहमंत्री राजनाथ सिंह हे देखील एम्स रुग्णालयात पोहोचले आहेत. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या प्रकृतीची ते विचारपूस करत आहेत.

10.00 AM : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत.

9.30 AM : मध्य प्रदेशमध्ये वाजपेयींसाठी आयुर्वेदिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून होम करुन प्रार्थना

भाजप नेत्यांची रुग्णालयाकडे धाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी संध्याकाळी एम्स रुग्णालयाला भेट देऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली. ते तासभर रुग्णालयात होते. त्यांनी अंदाजे ५० मिनिटं डॉक्टरांसोबत चर्चा केली. अटल बिहारी वाजपेयींच्या प्रकृतीची बातमी कळताच भाजप नेत्यांनी एम्स रुग्णालयाकडे धाव घेतली. सुरेश प्रभू, शाहनवाज हुसैन, पीयुष गोयल यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन अटल बिहारी वाजपेयींच्या तब्येतीची चौकशी केली. 

उपराष्ट्रपतींकडून प्रकृतीची चौकशी

अटल बिहारी वाजपेयींच्या प्रकृतीची बातमी कळताच थोड्याच वेळापूर्वी उपराष्ट्रपती वैकय्या नायडू देखील एम्स रुग्णालयात पोहोचले होते. त्यांनी डॉक्टरांकडून अटलजींच्या तब्येतीची चौकशी केली.

वाजपेयींवर ११ जूनपासून उपचार

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींवर ११ जूनपासून दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अटलजींची तब्येत नाजूक असताना त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.