नवी दिल्ली: अटल बिहारी यांचे बालपण आग्रा शहरात गेले. साधारण १० वर्षांचे असताना अटलजी आणि त्यांचे मित्र यमुना नदीवर जायचे. यावेळी त्यांचे मित्र नदीत पोहायला उतरायचे. मात्र, अटलजींना पोहता येत नसल्याने ते किनाऱ्यावर बसून राहायचे. यावरुन त्यांचे मित्र त्यांना नेहमी चिडवायचे.
अखेर एक दिवस चिडवण्याचा राग येऊन वाजपेयींनी नदीत उडी मारली. मात्र, पोहता येत नसल्याने ते बुडायला लागले. तेवढ्यात काही मित्रांनी अटलजींना नदीतून बाहेर काढले. या प्रसंगानंतर अटलजींना काही दिवस नदीत उडी मारायचे धाडस केले नाही. मात्र, काही दिवसांनी ते पोहायला शिकले.
वाजपेयींच्या निधनाची बातमी समजल्यानंतर येथील लोक एकत्र जमले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. किडनीसह अनेक अवयव निकामी झाल्याने वाजपेयी यांनी गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला, असे 'एम्स'ने जाहीर केले आणि अवघा देश शोकसागरात बुडाला. वाजपेयी यांचे पार्थिव नवी दिल्लीतील कृष्ण मेनन मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी आणि भाजप मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.