मुंबई : अपडेट 8:47 देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपपेक्षा खूप आघाडीवर आहे, येथे भाजपच्या वसुंधरा राजे सिंधिया या मुख्यमंत्री आहेत. राजस्थानमध्ये वसुंधरा राजे सिंधिया मंत्रिमंडळाचे अनेक मंत्री पिछाडीवर आहेत. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात सध्या चुरशीची लढत आहे. मध्य प्रदेशात सध्या भाजप आघाडीवर आहे, येथे शिवराज सिंह चौहान हे मुख्यमंत्री आहेत. मध्य प्रदेशचा सुरूवातीचा कौल त्यांच्या बाजूने दिसून येत आहे. तर छत्तीसगडमध्येही भाजप आघाडीवर आहे, येथे देखील सुरूवातीचा कौल भाजपच्या बाजूने आहे. तेलंगणातही काँग्रेस+टीडीपी आघाडीवर आहे. येथे भाजपची स्थिती फारच नाजूक आहे.
मध्य प्रदेशातील बुधनी मतदारसंघातून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आघाडीवर
राजस्थानच्या भाजपच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सध्या पिछाडीवर आहेत
राजस्थानात काँग्रेसचे सचिन पायलट आघाडीवर
राजस्थानमध्ये भाजपचे काही मंत्री पिछाडीवर