अमेठीत विद्यार्थ्यांनी राहुल गांधींना विचारले वीज-पाणी कधी मिळणार? उत्तर मिळाले मोदी, योगींना विचारा!

वीज-पाणीच्या प्रश्नावर राहुल गांधी बोलले, अमेठी हे योगी चालवत आहेत. माझे काम लोकसभेत कायदे बनण्याचे आहे. अमेठी त्यांना चालवायचे आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 17, 2018, 10:59 AM IST
अमेठीत विद्यार्थ्यांनी राहुल गांधींना विचारले वीज-पाणी कधी मिळणार? उत्तर मिळाले मोदी, योगींना विचारा! title=

अमेठी : केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांच्यानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी दोन दिवसांच्या अमेठी लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते एका शाळेतील विद्यार्थ्यांना भेटले. त्यानंतर त्यांच्यात जे संभाषण झाले त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अमेठी या राहुल गांधी यांच्या मतदार संघातील प्रश्नाबाबत एका विद्यार्थ्यांने प्रश्न उपस्थित केला. वीज आणि पाणी गावात कधी येणार? याचे उत्तर देताना बोट मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्याकडे दाखवले.

राहुल गांधी दोन दिवसांच्या अमेठीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी लखनऊला जाताना रस्ता मार्गाचा आधार घेतला. त्यावेळी राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले आणि शेतकऱ्यांना तुमचे प्रश्न लोकसभेत उपस्थित केले जातील, असे आश्वासन दिले.

विद्यार्थ्यानी काय प्रश्न विचारला?

शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यात आला. देशात कायदे बनविण्यात येत आहेत. ग्रामीण भागात हे कायदे योग्य तऱ्हेने लागू करण्यात येत नाहीत. याला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर दिले. हा प्रश्न मोदी यांना विचारा. सरकार ते चालवत आहेत. आमचे सरकार नाही. सरकार असेल तर आम्ही उत्तर दिले असते.

अमेठी प्रश्नावर काय बोलले राहुल?

विद्यार्थ्यांनी अमेठीचे खासदार राहुल गांधी यांना अमेठीवर प्रश्न विचारला. लोकसभा क्षेत्रात वीज, पाणी अशा सारख्या सोयी-सुविधा नाहीत, असं का? यावर राहुल गांधीनी उत्तर दिले.  अमेठी तो योगी चालवत आहेत. तर माझे काय लोकसभेत कायदे बनविण्याचे माझे काम आहे. अमेठी त्यांना चालवायची आहे. न वीज देणार आणि न पाणी देणे हे त्यांचे काम आहे. ही सर्व कामे त्यांना करायची आहे. मात्र, ते तसे करत नाहीत.