Stampede in Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात चेंगराचेंगरी, सात जणाचा मृत्यू; चंद्राबाबू नायडू यांच्या सभेला तुफान गर्दी

 टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू(chandrababu naidu) यांच्या रोड शो(Road Show) दरम्यान चेंगराचेंगरी(Stampede) झाली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये सात जणांचा मृत्यू  झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे देखील समजते.  

Updated: Dec 28, 2022, 11:30 PM IST
Stampede in Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात चेंगराचेंगरी, सात जणाचा मृत्यू; चंद्राबाबू नायडू यांच्या सभेला तुफान गर्दी title=

Stampede in Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात(Andhra Pradesh) राजकीय कार्यक्रमात भयानक घटना घडली आहे. टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू(chandrababu naidu) यांच्या रोड शो(Road Show) दरम्यान चेंगराचेंगरी(Stampede) झाली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये सात जणांचा मृत्यू  झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे देखील समजते.  नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुर येथे ही घटना घडली आहे. नायडू यांच्या रोड शो ला तुफान गर्दी झाली होती. 

चंद्राबाबू नायडू 28 ते 30 डिसेंबर या असे तीन दिवस नेल्लोर दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. यादरम्यान त्यांनी बुधवारी कंदुकूर येथे एका जाहीर सभा घेतली. या सेभेला प्रचंड गर्दी झाली होती. या सभेला संबोधित करत असताना टीडीपीचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले.  चेंगराचेंगरी होऊन 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण यात जखमी झाले आहेत. जखमीना उपचारासाठी रुग्णालायात दाखल करण्यात आल्याची माहितो स्थानिक पोलिसांनी दिली. 

 दरम्यान, चंद्राबाबूंनी एनटीआर ट्रस्टच्या माध्यमातून मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची आर्थिक मदत आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आश्वासन दिले आहे.