मुंबई : देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. (Coronavirus in India) रुग्णसंख्या वाढ होत असताना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्ण दगावत असल्याचे पुढे येत आहे. आता आंध्र प्रदेशतील (Andhra Pradesh) तिरुपती येथील सरकारी रुग्णालयात ( Ruia Govt Hospital Tirupati ) ऑक्सिजन नसल्यामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या 11 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
तिरुपतीमधील सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन (OXYGEN) नसल्यामुळे 11 रुग्णांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी एम हरिनारायण यांनी सांगितले की, ऑक्सिजनच्या अभावामुळे 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, सध्या रुग्णालयाजवळ 1 टँकर ऑक्सिजन आहे आणि टँकर सकाळीच पोहोचतील.
Andhra Pradesh: 11 patients died in Ruia Govt Hospital Tirupati due to a reduction in pressure of oxygen supply, says Chittoor District Collector Harinarayan. Chief Minister YS Jagan Mohan Reddy has ordered an inquiry into the matter. pic.twitter.com/eWY46QEizt
— ANI (@ANI) May 10, 2021
ऑक्सिजनपुरवठ्यात येणाऱ्या प्रेशरमध्ये घट झाल्यामुळे रुईया शासकीय रुग्णालयात तिरुपती येथे 11 रूग्णांचा मृत्यू झाल्याचे चित्तूरचे जिल्हाधिकारी हरिनारायण यांनी सांगितले. मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत
तिरुपतीमधील रुईया सरकारी रुग्णालयामधील ही दुर्दैवी घटना आहे,असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हाधिकारी यांनी 11 जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे, तर रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. भारती यांच्यानुसार 12 जणांचा मृत्यू झाला आहे. अक्षिकच्या मते, कोरोनाचे 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहेत आणि 3 कोविड नसलेल्या रुग्णांनी आपला जीव गमावला. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.