दिल्ली : कोविड -19 च्या संसर्ग भारतात वेगाने पसरत आहे, यामुऴे सध्या अनेक लोकं संक्रमित झाले आहेत. कोरोनाचा हा व्हेरियंट शरीरात लस घेतल्यानंतरही फसवूण लोकांना संक्रमित करु शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी एएफपीला दिलेल्या मुलाखतीत हा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, आज आपण भारतात या कोरोनाचे जे रुप पहात आहोत, तो आपल्यला सूचित करत आहेत की, तो फार वेगाने पसरणारा भयानक व्हेरियंट आहे.
देशात शनिवारी कोविड -19 मुळे 24 तासांत पहिल्यांदाच 4 हजाराहून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे आणि 4 लाखाहून जास्त नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे देशाची राजधानी दिल्लीला कडक लॅाकड़ाऊन लावावा लागला आहे. तसेच यामुळे दिल्लीची आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडून गेली आहे.
बर्याच तज्ञांचा असा संशय आहे की, या कालावधीत झालेले मृत्यू आणि संक्रमित रुग्णांची संख्या कमी नोंदवली गेली असू शकते. ही संख्या यापेक्षा ही अधिक असण्याची शक्यता आहे.
क्लिनिकल शास्त्रज्ञ स्वामीनाथन म्हणाल्या की, "गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रथमच भारतात सापडलेल्या कोविड -19 चा B.1.617 हा व्हेरियंट भारतातील या परिस्थितीचे मुख्य कारण आहे" ते म्हणाले की, "हे भारतात पसरवणाऱ्या कोरोना व्हेरियंटमधील सर्वात वेगवान पसरणारे व्हेरियंट आहे. हा व्हेरियंट कोरोनाच्या मूळ व्हेरियंट पेक्षा जास्त प्राणघातक आणि संसर्गजन्य असल्याचे संकेत मिळत आहेत."
अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक राष्ट्रीय आरोग्य अधिकाऱ्यांनी B.1.617 या व्हेरियंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. लवकरच यावर डब्ल्यूएचओ काम करेल अशी आशा स्वामीनाथन यांना आहे. त्यांनी नमूद केले की, B.1.617 हा व्हेरियंट चिंताजनक ठरू शकतो, कारण त्यात काही म्यूटेशन असे आहेत की, ज्यामुळे संसर्ग वाढतो तसेच तो व्हॅक्सिन किंवा नैसर्गिक पणे उद्भावणाऱ्या अँटिबॅाडिज तयार होण्यास प्रतिबंध करतो.