नवी दिल्ली : महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा ट्वीटरवर खूप जास्त अॅक्टिव्ह असतात. वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यावर बऱ्याचदा ते आपलं मतही मांडत असतात. त्याचं एक ट्वीट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या ट्वीटमध्ये केवळ 12 हजार 421 रुपयांमध्ये कार मिळत असल्याचं लिहिलं आहे.
आनंद महिंद्रा यांनी 1960 रोजीची एक जुनी जाहिरात ट्वीट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की जीपची किंमत 200 रुपयांनी कमी झाली आहे. ती फक्त 12 हजार 421 रुपयांना मिळत होती. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही जाहिरात शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी त्यांचे जुने दिवस आठवले.
जाहिरातमध्ये असं म्हटलं आहे की, “जीपच्या किमती कमी झाल्या आहेत. महिंद्र अँड महिंद्रा विलीज मॉडेल CJ 3B जीपच्या किंमतीत रु. 200 ची कपात करताना आम्हाला आनंद होत आहे. जाहिरात शेअर करत महिंद्रा म्हणाले की, एक चांगला मित्र आणि कुटुंब बऱ्याच काळापासून आमच्यासाठी काम करत आहे. त्यांनी त्यांच्या आठवणीतून एक चांगली जाहिरात काढली आहे. या जाहिरातीमुळे ते जुने दिवस आठवले.
आनंद महिंद्रा यांच्या ट्वीटवर युझर्सनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या किंमतीमध्ये आम्ही आता वाहन घेऊ शकतो का असा प्रश्नही विचारला आहे. त्यावर उत्तर देताना आताच्या काळात तुम्ही या किंमतीमध्ये कोणत्या वस्तू गाडीच्या खरेदी करू शकता यावर चर्चा केली आहे. युजर्सशी चर्चा करताना थारचा स्क्रिनशॉट शेअर केला आणि सांगितले की महिंद्रा Amazon वर विकल्या जाणार्या थारची 10 डाय-कॉस्ट खेळणी या किमतीत खरेदी करू शकता.
A good friend, whose family has been distributing our vehicles for decades fished this out from their archives. Aaah the good old days…when prices headed in the right direction! pic.twitter.com/V69sMaM98X
— anand mahindra (@anandmahindra) March 6, 2022