लॉकडाऊन संपल्यावर आनंद महिंद्रा असं करणार सेलिब्रेशन, मजेशीर व्हिडीओ

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रीय

Updated: Apr 15, 2021, 12:49 PM IST
लॉकडाऊन संपल्यावर आनंद महिंद्रा असं करणार सेलिब्रेशन, मजेशीर व्हिडीओ title=

मुंबई : आनंद महिंद्रा जगातील सर्वात यशस्वी उद्योजकांमध्ये गणले जातात. आपल्या नेहमीच्या कामात व्यस्त असूनही आनंद महिंद्रा सोशल मीडियामध्ये खूप अ‍ॅक्टिव्ह असतात. त्यांनी शेअर केलेले ट्वीट सामाजिक संदेश देणारे किंवा मनोरंजन करणारे असतात. आनंद महिंद्रा आजुबाजूला काही वेगळ  पाहतात तेव्हा ते लगेच ट्विटरवर शेअर करतात, काही तासातच त्यांचे ट्वीट रिट्वीट होऊन त्यावर चर्चा सुरु होतात. 

नुकताच त्यांनी ट्विटरवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. जो लोकांचे लक्ष आकर्षित करीत आहे. आनंद महिंद्रा यांनी एका कुत्र्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. जो झेप घेऊन मजेदार शैलीत उड्या मारत आहे. ट्विटरवर कुत्र्याचा व्हिडिओ शेअर करताना महिंद्रा म्हणतात, लॉकडाऊन संपल्यावर मी देखील असाच आनंदी होईन. आपल्या निवाऱ्यातून बाहेर पडल्यावरच्या आनंदात  कुत्रा कसा उड्या मारतोय हे या व्हिडीओत दिसतंय. 

आनंद महिंद्रा यांनी ट्वीटरवर व्हिडिओ शेअर केल्यानंतर लोकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केलीय. आतापर्यंत  45 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याच वेळी, 1700 हून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाईक केलाय. लॉकडाऊनच्या काळात सर्वजण घरी असताना फिरण्याच्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांना कळतोय. त्यामुळे सर्वांना हा मजेशीर व्हिडीओ आवडतोय.