नेटकऱ्याच्या कमेंटनंतर आनंद महिंद्रांचा महत्वाचा निर्णय

नेटकऱ्याने दिला आनंद महिंद्रा यांना सल्ला... 

Updated: Jul 19, 2019, 04:37 PM IST
नेटकऱ्याच्या कमेंटनंतर आनंद महिंद्रांचा महत्वाचा निर्णय  title=

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा या उद्योगसमूहाच्या अध्यपदी असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी एका नेटकऱ्याच्या कमेंटनंतर एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला. ट्विट करत त्यांनी या निर्णयाविषयी माहिती दिली. यापुढे कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करण्यात येणार नाही, असं त्यांनी यामध्ये स्पष्ट केलं होतं.

सध्या देशात प्लास्टिक पासून बनल्या जाणाऱ्या वस्तू न वापरण्याची मोहिम सुरू आहे. याशिवाय सरकारने देशात पॉलिथीनवरसुद्धा बंदी आणली आहे. जर कोणी पॉलीथिन वापर करताना आढळला तर त्याला दंड द्यावा लागणार आहे, असा सरकारने निर्यण घेतला आहे. याच निर्णयाच्या आधारे आनंद महिंद्रा यांनी सुध्दा एक निर्णय घेतला आहे. काही दिवसापूर्वीच आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या कार्यकारिणीसोबतची एक बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी त्यांच्या बैठकीमधील एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये स्पष्ट दिसून येत आहे की, बोर्ड मेंबर यांच्या जवळ प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी ठेवण्यात आले आहे. 

म फोटो बघून एका नेटकऱ्याने आनंद महिंद्रा यांना सल्ला दिला की, मला वाटते की, बोर्ड रूममध्ये प्लास्टिकच्या बॉटलच्या जागी स्टील बॉटल असायला हवी. नेटकऱ्याच्या या कमेंटला आनंद महिंद्रा यांनी उत्तर दिले की, 'प्लास्टिकच्या बॉटलवर बंदी करण्यात येणार आहे. पण, तूर्तास आम्ही या गोष्टीबद्दल खेद व्यक्त करतो.' आपल्या कार्यकारिणीच्या बैठकीत प्लास्टिक बॉटलच्या वापराविषयी खेद व्यक्त करत महिंद्रा यांनी या बाटल्यांचा पुनर्वापर अर्थाच रिसायकलिंग करण्याचं समर्थन केलं. 

आनंद महिंद्रा सोशल मीडियावर फार सक्रिय असतात शिवाय या माध्यमावर ते कायमच मीडियावर बिधास्त प्रतिक्रिया मांडतात. काही दिवसापूर्वी त्यांनी एका शेतकऱ्याच्या झाडावर चढणाऱ्या बाईकची प्रशंसा केली. याव्यतिरिक्त त्यांनी या बाईकला बनविण्याला उत्सुकता सुद्धा दाखवली.