Viral Old MAN Video: आपल्याला आपल्या आयुष्यात कधी ना कधीतरी एकटेपणा जाणवतो त्यामुळे आपण आपला एकटेपणा दूर करण्यासाठी काहीतरी वेगळं करावेच लागते. आपण आपापल्या परीनं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतोच. परंतु वृद्धाश्रमात एकटेच राहणाऱ्या वयस्कर (Senior Citizens) लोकं आपला वेळ कसा बरं घालवत असतील असा प्रश्नच आपल्याला पडतो नाही? आयुष्यभराची शिदोरी घेत अखेर आपल्या आयुष्याची सरती वर्षे वृद्धाश्रमात काढण्याची वेळ जेव्हा या लोकांवर येते तेव्हा आपल्यालाही अनेकदा वाईट वाटतं परंतु आपल्या उतारवयातही आपण आपलं आयुष्य कसं सुंदरपणे आणि निरागसतेनं जगू शकतो याचं उदाहरण देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये असेच एक वृद्धाश्रमात राहणारे वयोवृद्ध गृहस्थ मोहम्मद रफींचे गाणं म्हणतात आणि सगळ्यांचेच मनं जिंकून घेतात.
त्यांच्या या व्हिडीओकडे (Viral Video) पाहून सगळ्यांनाच एक वेगळी स्फुर्ती मिळते आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचा चर्चचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की हे वृद्धाश्रमात राहणारे 85 वर्षीय गृहस्थ हातात माईक घेतात आणि आपलं आवडतं गाणं म्हणायला सुरूवात करतात. सध्या त्यांच्या या व्हिडीओनं सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली आहेत त्याचा प्रयत्न तुम्हाला या व्हिडीओच्या खाली आलेल्या कमेंट्स वाचून येईलच. आयुष्य हे किती सुंदर आहे आणि आपण त्या आयुष्याचा किती सकारात्मक पद्धतीनं वापर करू शकतो हे या व्हिडीओकडे पाहून कळतं.
हा व्हिडीओ माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी ट्विटरवर (Twitter) पोस्ट केला आहे. कालच हा व्हिडीओ अनेक जणांनी मोठ्या संख्येनं पाहिला आहे. या व्हिडीओत तुम्हाला हे वयस्कर आजोबा गाणं गाताना दिसत असतीलच आणि व्हिडीओच्या मागून तुम्हाला गाण्याचे सुरूही ऐकू येत असतील.
तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील वृद्धाश्रमात हा व्हिडीओ रेकॉर्ड (Tamilnadu) करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना दयानंद कांबळे यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, कोईम्बतूरमधील वृद्धाश्रमातील एक 85 वर्षीय वृद्ध बॉलिवूडचं गाणं गात आहेत. या व्हिडीओला काही वेळातच खूप व्ह्यूज आणि कमेंट्स आल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होतो आहे.
या व्हिडीओकडे पाहून निराश असणाऱ्यांनाही एक वेगळीच उर्जा मिळेल. या व्हिडीओखाली अनेकांनी या आजोबांचे कौतुकही केले आहे. त्याचसोबत त्यावेळी उपस्थित असणाऱ्यांनीही या वृद्ध आजोबांचे ताळ्या वाजवत कौतुकही केले आहे.