रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची (Navneet Rana Death Threat) धमकी देण्यात आली आहे. नवनीत यांना मोबाईल कॉलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर नवनीत यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. (amravati lok sabha constituency mp navneet rana threatened to kill)
नवनीत यांना मंगळवारी संध्याकाळी हा धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने "महाराष्ट्रात तुम्हाला येऊ देणार नाही. तसेच हनुमान चालिसा पठण केल्यास जीवे मारु", अशी धमकी देण्यात आली.
दरम्यान या धमकीनंतर नवनीत राणा यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तसेच धमकी देणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नवनीत यांनी केली आहे.