नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद वाढवणारा, शस्त्रांच्या जोरावर खोऱ्यात दहशत पसरवणारा आणि काश्मीरच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा यासीन मलिक याला कोर्टाने जन्मठेप सुनावली आहे. आज यासीन मलिकच्या शिक्षेवर कोर्टाने निर्णय दिला. मलिकच्या शिक्षेवरून पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. यासीन मलिकची पत्नी मुशाल हुसैन मलिकही उघडपणे पतीच्या समर्थनात उतरली आहे.
1986 मध्ये जन्मलेली मुशाल हुसैन ही कराची, पाकिस्तानची आहे. ती पाकिस्तानातील अत्यंत श्रीमंत कुटुंबातून आली आहे. यासीन मलिक आणि मुशालने फेब्रुवारी 2009 मध्ये लग्न केले होते. 2012 मध्ये दोघांना एक मुलगी झाली, तिचे नाव रजिया सुलतान आहे. मुशाल यासिनपेक्षा 20 वर्षांनी लहान आहे.
मुशाल हुसैनचे वडील एमए हुसैन हे प्रसिद्ध अर्थतज्ञ होते. तर मुशालची आई रेहाना या पाकिस्तानी मुस्लिम लीगच्या नेत्या होत्या. मुशालचा भाऊ अमेरिकेत परराष्ट्र धोरण विश्लेषक आहे.
यासीन आणि मुशालचे लग्न कसे झाले?
मुशाल आणि यासीन यांची भेट 2005 मध्ये झाली होती. तेव्हा यासीन पाकिस्तानात होता. काश्मीरच्या फुटीरतावादी चळवळीला पाकिस्तानचा पाठिंबा मिळवण्यासाठी तो तिथे गेला होता. यादरम्यान यासीनची मुशालशी भेट झाली. यासीन मलिकचे भाषण ऐकल्यानंतर मुशाल खूप प्रभावित झाली, त्यानंतर दोघेही प्रेमात पडले. नंतर, मुशाल आणि यासीनची आई हज यात्रेला भेटली, जिथे त्यांनी त्यांच्या लग्न निश्तित केले.
एका मुलाखतीत मुशाल म्हणाली होती की, मी त्याच्याकडे (यासीन) गेली आणि म्हणाली की मला त्याचे भाषण आवडले. मी त्याच्याशी हस्तांदोलन केले आणि त्याने मला त्याचा ऑटोग्राफ दिला. यानंतर संभाषण सुरू झाले आणि एके दिवशी यासीनने मुशालला प्रपोज केले. संवादादरम्यान यासीनने मुशालला सांगितले- मला पाकिस्तान आवडतो, विशेषत: तू.
मुशाल हुसैन सोशल मीडियावर काश्मीरबद्दल सतत पोस्ट करत असते. यासीन मलिकबाबतही तिने अनेक भारतविरोधी पोस्ट केल्या आहेत. तिच्या पोस्टला पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह इतर नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. मुशालने भारत सरकारकडे यासीनच्या सुटकेची मागणी केली आहे. यासीनच्या सुटकेबाबत पाकिस्तानात निदर्शने होत आहेत.
2017 मध्ये, NIA ने JKLF नेता यासीन मलिक विरोधात टेरर फंडिंगचा गुन्हा दाखल केला होता. पाकिस्तानकडून पैसे घेऊन काश्मीरमध्ये फुटीरतावाद आणि दहशतवाद वाढवल्याचा आरोप मलिकवर होता. नंतर 19 मे 2022 रोजी एनआयए कोर्टाने यासीन मलिकला दोषी ठरवले. आता आज त्याला शिक्षा होणार आहे. यासीन मलिक सध्या तिहार तुरुंगात बंद आहे.
मलिकवर 1990 मध्ये हवाई दलाच्या 4 जवानांची हत्या केल्याचाही आरोप आहे, ज्याची त्याने स्वतः कबुली दिली आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री असलेले मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिचे अपहरण केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे.