मार्केटमध्ये एन्ट्री घेणार ही जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर; पूर्ण चार्जवर धावणार 121 किमी

 ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबोला आहे. एक आणखी इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये धूम करायाला तयार आहे

Updated: Oct 16, 2021, 03:57 PM IST
मार्केटमध्ये एन्ट्री घेणार ही जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर; पूर्ण चार्जवर धावणार 121 किमी title=

मुंबई : ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबोला आहे. एक आणखी इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये धूम करायाला तयार आहे. Ampere Electric ने गुरूवारी आपली ई स्कूटर रेंजला पुढे वाढवत Mangnus EX ला लॉंच केले आहे. आणखी बेस्ट फीचरसह मॅग्नस EX ची किंमत 68 हजार 999 रुपये आहे. 

121 किलोमीटरची मायलेज आहे.
कंपनीने म्हटले की, वेगवेगळ्या राज्यात सरकारांपासून ई-व्हेहिकल इंसेटिव पॉलिसी अंतर्गत नवीन स्कूटर ग्राहकांना आकर्षित करतील. तसेच स्कूटरची किंमत देखील आकर्षक असणार आहे. येणाऱ्या फेस्टिव सीजनमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढण्याची शक्यता आहे. 

Ampere ने म्हटले की, Mangnus EX एकदा पूर्ण चार्जिंग केल्यानंतर 121  किलोमीटरपर्यंत मायलेज देते.

ग्राहकांना फायदा
एम्पीयर इलेक्ट्रिक च्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर रॉय कुरियन यांनी म्हटले की, ग्राहक योग्य किंमतीत मिळणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या शोधात आहेत. ते पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे त्रस्त आहेत. अशातच माफक किंमतीत एम्पीयरची इलेक्ट्रिक स्कूटर चांगला पर्याय ठरू शकते. चांगल्या परफॉर्मन्ससह ग्राहकांची बचत देखील होऊ शकते.

Mangnus EX ची बॅटरी पोर्टेबल आहे. ही बॅटरी एडवान्स लिथियमची आहे. जी घर, ऑफिसमधील प्लगला लावून चार्ज करता येऊ शकते.