मुलाला वाचवण्यासाठी बापाची धडपड, सायकलवरून तब्बल 300 किमीचा प्रवास

काळजाच्या तुकड्याला वाचवण्यासाठी वडिलांनी रात्रंदिवस एक केला

Updated: Jun 1, 2021, 02:08 PM IST
 मुलाला वाचवण्यासाठी बापाची धडपड, सायकलवरून तब्बल 300 किमीचा प्रवास title=

मुंबई : 'डॉक्टरांनी मला विश्वास दिलाय की, माझ्या मुलाने 18 वर्षांपर्यंत एकही दिवस औषध टाळलं नाही. असं केलं तर तो अगदी सामान्य मुलांप्रमाणे होईल. त्यामुळे त्याची औषधं न थांबण हा एकच विचार माझ्या डोक्यात आला. आणि ही गोष्ट मी करण्याचा विचार केला.' असं 45 वर्षीय आनंद सांगतात.

आनंद यांनी सायकलच्या मदतीने मुलाचं औषध आणण्यासाठी तब्बल 300 किमीचा प्रवास केलाय. आपलं गाव ते बंगळुरू असा सायकलचा प्रवास दिवस-रात्र करून आपल्या स्पेशल चाईल्ड असलेल्या मुलाचे औषध आणले आहे. 

कोरोनाच्या महामारीमुळे खासगी बस सेवा बंद आहे. अशा परिस्थिती आनंद यांचं गाव ते बंगळुरू येथे लॉकडाऊनमुळे खासगी बस वाहतुक पूर्णपणे बंद आहे. आनंद यांची परिस्थिती देखील हलाकीची असल्यामुळे त्यांना खासगी वाहनं करणं परवडणारं नाही. 

रोजगार कामगार असलेले आनंद यांनी मुलाचं औषध आणण्यासाठी सायकलवरून प्रवास करण्याचा निर्णय घेतला. मैसूरमधील एका छोट्याशा गावातून त्यांनी थेट बंगलुरूतील मेडिकल सायकलवरून गाठलं. 

आनंद यांनी तब्बल 300 किमीचा प्रवास करून बंगलुरूतील निमहांस शहरातून विशेष मुलासाठी  औषधे विकत घेतली. आपल्या मुलाच्या भविष्याचा विचार करून आनंद यांनी जे योग्य होतं ते केलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आनंद यांचा जॉब तर हिरावून घेतलाच सोबत एक कायमची भीती मनात निर्माण केली. आपल्या 10 वर्षांच्या विशेष मुलासाठी आनंद यांनी खास प्रयत्न करते.