Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात अगदी विधीवत पार पडलं लग्न

कोरोनामुळे सगळ्या गोष्टी थांबल्या असताना हे दाम्पत्य मात्र अडकलं लग्नबंधनात 

Updated: Apr 16, 2020, 12:56 PM IST
Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात अगदी विधीवत पार पडलं लग्न  title=

मुंबई : देशभरात लॉकडाऊनमुळे सर्वच गोष्टी थांबल्या आहेत. सतत काही ना काही घडत असणाऱ्या या जगात आज कोरोना व्हायरसमुळे निरव शांतता आहे. या लॉकडाऊनमुळे अनेकांची लग्न देखील पुढे ढकलण्यात आली आहे. असं असतानाही एक लग्न मात्र ठरलेल्या मुहूर्तावर अगदी विधीवत पद्धतीने पार पडलं आहे. 

अनेक जिल्ह्यांमधील लग्न ही लॉकडाऊनमुळे पुढे ढकलण्यात आली. असं असल तरीही रोहतक कोर्टाकडून एका दाम्पत्याला खूप मोठी मदत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निरंजन कश्यप नावाच्या मुलाला ऑनलाईन लँग्वे ऍपच्या माध्यमातून मॅक्सिकोच्या मुलीसोबत प्रेम झालं. 

निरंजनने दिलेल्या माहितीनुसार, आमची ओळख ही एका लँग्वेज लर्निंग ऍपवरून झाली. २०१७ रोजी डॅना माझ्या वाढदिवसादिवशी भारतात आली. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात डॅना आणि तिची आई आमच्या लग्नाकरता भारतात आले. १७ फेब्रुवारीला आम्ही स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत लग्न करण्याची नोंद केली. यानुसार ३० दिवसाची आम्हाला नोटीस मिळाली.'

कश्यपने दिलेल्या माहितीनुसार, नोटीस १८ मार्चला संपली. तोपर्यंत लॉकडाऊनची घोषणा झाली होती. त्यामुळे आम्ही लग्न करू शकलो नाही. त्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक अर्ज दिलं ज्यामुळे आमचं लग्न संपन्न झालं. 

कश्यपची होणारी पत्नी डॅना ही फेब्रुवारी महिन्यात आईसोबत भारतात आली होती. २४ मार्चला त्यांच फ्लाइट बुक करण्यात आलं होतं. त्यामुळे या काळात लग्न होणं आवश्यक होतं. जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने आमटं लग्न पार पडलं.