ऍमेझॉनने 36 तासांत विकले 750 करोड रुपयांचे मोबाइल फोन

29 सप्टेंबरपासून सुरू झाला सेल 

Updated: Sep 30, 2019, 08:43 AM IST
ऍमेझॉनने 36 तासांत विकले 750 करोड रुपयांचे मोबाइल फोन  title=

मुंबई : आर्थिक सुस्ती आणि कमी मागणी असूनही ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने सेलमध्ये चांगलीच कमाई आहे. ऍमेझॉनने शनिवारी सुरू केलेल्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये 36 तासांत आपल्या प्लॅटफॉर्मवर 750 करोड रुपयाचे स्मार्टफोन विकल्याचा दावा केला आहे. तर फ्लिपकार्टने 'बिग बिलियन सेल' ने पहिल्या दिवशी दुप्पट कमाई केली आहे. 

आतापर्यंत दोन्ही कंपन्यांनी पहिल्या दिवसाची कमाई कुठेही शेअर केलेली नाही. हा ऑनलाईन सेल चार ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या सणांच्यावेळी असलेला सेल संपेपर्यंत जवळपास पाच अरब डॉलरची कमाई करण्याची शक्यता आहे. या दोन कंपन्यांबरोबरच स्नॅपडील, क्लब फॅक्टरी आणि इतर कंपन्यांचे देखील सेल आहेत. 

ऍमेझॉन ग्लोबलचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि भारताचे प्रमुख अमित अग्रवाल यांनी सांगितल्यानुसार, चांगल्या ऑफर्स असल्यामुळे ग्राहकांनी वन प्लस, सॅमसंग आणि ऍपल सारख्या प्रिमीयम ब्रँडच्या मोबाइलची विक्री जास्त झाली आहे. याचप्रमाणे टीव्हीच्या विक्रीत पहिल्या 36 तासात दुप्पटीने वाढ झाली आहे.

याव्यतिरिक्त इतर गोष्टींची तुलना करायची झाली तर, फॅशन विक्रीमध्ये पाच टक्के वाढ झाली आहे. ब्युटी प्रो़डक्टमध्ये सात टक्के वाढ झाली आहे. खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये छोट्या शहरातील ग्राहकांचा देखील समावेश आहे. पहिल्या 36 तासांत जवळपास 42,500 ग्राहकांनी एक तरी ऑर्डर स्विकारली आहे. 

फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णामूर्ती यांनी सांगितलं की, फॅशन, ब्यूटी, रोजच्या वापरातील सामान आणि फर्नीचर याच्यात गेल्या वर्षाच्या सेलपेक्षा वाढ झाली आहे. त्यामुळे 29 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या सेलला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. हा सेल 4 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.