यात तुमचं पार्सल तर नाही? Amazon - Flipkart च्या ऑर्डर्सची फेकाफेक पाहून तुम्हीही धसका घ्याल

पैसे वाया जाण्यापेक्षा सावधगिरी बरी! 

Updated: Aug 29, 2022, 04:43 PM IST
यात तुमचं पार्सल तर नाही? Amazon - Flipkart च्या ऑर्डर्सची फेकाफेक पाहून तुम्हीही धसका घ्याल title=
amazon and Flipkart parcels theown out og train thing before online shopping

Amazon - Flipkart : ऑनलाईन शॉपिंग करण्याचा पर्याय अनेकजण निवडताना दिसतात. वेळेचा अभाव, असंख्य ऑफर्स, बचत आणि एकाच ठिकाणी अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळं Online Shopping करण्याकडेच अनेकांचा कल दिसतो. 

मागवलेली वस्तू किंवा गोष्ट जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचते, त्यानंतर होणारा आनंद काही औरच. पण, जेव्हा हीच गोष्ट तुटलेल्या अवस्थेत तुमच्यापर्यंत पोहोचते तेव्हा होणारा मनस्ताप शब्दांत मांडता येत नाही. 

हे असं का होतं, नाजूक वस्तूही यांना हाताळता येत नाहीत का म्हणत काहीजण मग डिलिव्हरी बॉयला सुनावू लागतात. पण, मुद्दा असा की खरंच ते चुकलेले असतात का? 

तसं नाहीये. सध्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जिथं रेल्वेतून आलेले Amazon आणि फ्लिपकार्टचे पार्सल किती वाईट पद्धतीनं प्लॅटफॉर्मवर फेकण्यात येत आहेत ते पाहायला मिळत आहे. बॉक्सच्या आत नाजूक वस्तू असेल, ते व्यवस्थित हाताळावं याची कशाचीच चिंता न करता ही मंडळी धडाधड ट्रेनमधून लहान-मोठे खोके बाहेर फेकत आहेत. 

ही घाई यासाठी, कारण रेल्वेला पुढच्या स्थानकाच्या दिशेनं रवाना व्हायचं आहे. हा इतका निष्काळजीपणा पाहिल्यानंतर तुम्हीही दोनदा विचार कराल, की ई- कॉमर्स साईटवरून खरेदी करायची की नाही. 

ग्राहकांकडून पॅकेजिंक आणि फास्ट डिलिव्हरीसाठीही पैसे आकारणाऱ्या या वेसबाईट्सकडून सामान खरंच इतक्या निर्दयीपणे हाताळलं जात असल्याचं पाहून सोशल मीडियावर अनेकांनीच संताप व्यक्त केला आहे. काहींनी तर, online खरेदी न करण्याचाच निर्णयही घेतला आहे.