मैनपूरी : उत्तरप्रदेशातील मैनपूरी जिल्ह्यात एका महिलेने तीन डोके असलेल्या बाळाला जन्म दिला आहे. या बाळाला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक पोहचत आहेत. लोकांमध्ये बाळाबाबत उलट सूलट चर्चा आहेत. काही लोक बाळाला देवाचा अवतार मानत आहेत. सध्या आई आणि बाळ दोन्हींची प्रकृती उत्तम आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्टार्ज देण्यात आला आहे.
मैनपूरीच्या गुलारियापूर गावातील ही घटना आहे. येथे राहणाऱ्या रागिनी नावाच्या महिलेने तीन डोके असलेल्या बालकाला जन्म दिला आहे. डॉक्टर आणि नातेवाईकही बुचकाळ्यात पडले आहेत. रागिनीच्या नातेवाईकांनी म्हटले की, रागिनी नऊ महिन्याची गर्भवती होती. त्यानंतर तिला प्रसववेदना जाणवल्या. कुटूंबियांनी तिला रुग्णालयात नेले. तेथे तिने विचित्र बालकाला जन्म दिला. तीन डोके असणाऱ्या बाळाला पाहण्यासाठी रुग्णालयातील लोकांनीही गर्दी केली.
रागिनी आणि बाळाची तब्बेत उत्तम असल्याने कुटूंबियांनी त्यांना घरी नेले आहे. परंतु गावात आणि परिसरात तीन डोके असलेल्या बाळाची जोरदार चर्चा आहे. सर्वांसाठी हा कुतूहलाचा विषय बनला आहे. ज्याला माहिती मिळते तो धावत पहायला येत आहे.