पेटीएमचा IPO येण्याचा मार्ग मोकळा; देशातील सर्वात मोठा IPO ठरणार

डिजिटल पेमेंट आणि फायनांशिअल सर्विस कंपनी पेटीएमचा IPO येण्याची प्रक्रीया गतिमान झाली आहे

Updated: Jul 13, 2021, 07:51 AM IST
पेटीएमचा IPO येण्याचा मार्ग मोकळा; देशातील सर्वात मोठा IPO ठरणार title=

मुंबई : डिजिटल पेमेंट आणि फायनांशिअल सर्विस कंपनी पेटीएमचा IPO येण्याची प्रक्रीया गतिमान झाली आहे. सोमवारी कंपनीच्या शेअरहोल्डर्सने 16600 कोटी रुपयांचा देशातील सर्वात मोठा आयपीओ आणण्याला मंजूरी दिली आहे. 

देशातील सर्वात मोठा आयपीओ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेअर धारकांच्या EGM मध्ये सर्व प्रस्तावांना मंजूरी दिली आहे. शेअरधारकांनी आयपीओमधून 12 हजार कोटी रुपयांपर्यंतचे शेअर जारी करण्याला मंजूरी दिली आहे. तसेच सेकंडरी शेअर्सच्या विक्रीतून एकूण 16600 कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. 

विजय शर्मा यांना प्रोमोटर्सच्या स्वरूपात मान्यता नाही
कंपनीचे शेअरधारकांनी हा देखील प्रस्ताव पारीत केला की, कंपनीचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना कंपनीचे प्रमोटर्स च्या स्वरूपात मान्यता देण्यात येणार नाही. परंतु ते पेटीएमचे सीईओपदी कायम राहतील. आयपीओ नंतर कंपनीची मार्केट वॅल्युएशन वाढून 1.78 लाख कोटी रुपयांवरून 2.2 लाख कोटी रुपयांच्या मध्ये असू शकते.

पेटीएम देशातील 10 टॉप लिस्टेट फायनांशिअल सर्विसेसमध्ये सामिल होण्याची आशा आहे.  कंपनी याच आठवड्यात संबधीत दस्ताऐवज जमा करू शकते. आतपर्यंत सर्वात मोठ्या आयपीओचा रेकॉर्ड कोल इंडियाच्या नावावर होता. कोल इंडियाने 2010 मध्ये 15500 कोटी आयपीओच्या माध्यमातून उभारले होते. 

कंपनीत कोणाची किती भागिदारी
पेटीएममध्ये अलिबाबाच्या Ant गृपची भागिदारी 29.71 टक्के इतकी आहे. जपानच्या सॉफ्टबँकची 19.63 टक्के, SAIF पार्टनर्सची 18.56 टक्के तर विजय शेखर शर्मा यांची 14.67 टक्के आहे.