लग्नाच्या 3 मिनिटातच पत्नीने दिला घटस्फोट, जगातील सर्वात कमी टिकलेलं लग्न... हे आहे कारण

Wedding With Divorce : पती आणि पत्नीमध्ये या ना त्या कारणावरुन भांडणं होत असतात, कधी ही भांडणं लगेच सुटतात तर कधी अनेक महिन्यांपर्यंत एकमेकांशी अबोला धरला जातो. काही घटनांमध्ये प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचतं. पण जगातलं असं एक लग्न समोर आलंय जे केवळ तीन मिनिटंच टिकलं.

राजीव कासले | Updated: Jul 23, 2024, 04:14 PM IST
लग्नाच्या 3 मिनिटातच पत्नीने दिला घटस्फोट, जगातील सर्वात कमी टिकलेलं लग्न... हे आहे कारण title=

Weird Wedding : पती आणि पत्नीमध्ये या ना त्या कारणावरुन भांडणं होत असतात, कधी ही भांडणं लगेच सुटतात तर कधी अनेक महिन्यांपर्यंत एकमेकांशी अबोला धरला जातो. काही घटनांमध्ये प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचतं. पण जगातलं असं एक लग्न समोर आलंय जे केवळ तीन मिनिटंच टिकलं. कुवैतमध्ये ही घटना घडली आहे. एका जोडप्याने लग्नाचे सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर तीन मिनिटातचं एकमेकांपासून घटस्फोट घेतला. कुवैतमध्ये लग्नाचे सोपस्कर आटपून जोडपं कोर्टाच्या बाहेर पडलं. बाहेर पडताना नवविवाहिता कोर्टाच्या पायऱ्यांवर पडली. यावेळी पत्नीला सावरण्याऐवजी पतीने शिवी दिली. यामुळे संतापलेल्या पत्नीने कोर्टाच्या पायऱ्यांवर पतीला घटस्फोट दिला. 

काय झालं नेमकं?
कुवैतमध्ये एका प्रियकर-प्रेयसीने लग्नाचा निर्णय घेतला. दोघांनी सहमतीने कोर्टात रजिस्टर पद्धतीने लग्न करण्याचं ठरवलं. ठरलेल्या दिवशी दोघंही काही मोजके नातेवाईक आणि पाहुण्यांसह कोर्टात पोहोचले. कोर्टाच्या नियमांनुसार दोघांचा विवाह पार पडला. दोघांनी एकमेकांच्या बोटात अंगठ्या घातल्या आणि सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या. नातेवाईक-पाहुण्यांना पेढे भरवण्यात आले. त्यानंतर हे जोडपं कोर्टाच्या बाहेर पडलं. बाहेर पडताना नवविवाहितेचा तोल गेला आणि ती कोर्टाच्या पायऱ्यांवर पडली. यावेळी पतीने तिला पकडण्याऐवजी बेवफूक अर्थात मूर्ख असं म्हटलं. 

हे ऐकताच नवविवाहितेचा पारा चढला तीने पुन्हा कोर्टात जात न्यायाधिशांना लग्न मोडण्याची विनंती केली. न्यायाधिशांनी सर्व कहाणी ऐकून घेतल्यानंतर घटस्फोटाला मंजूरी दिली. लग्नानंतर फक्त तीन मिनिटांनी लग्न मोडलं. जगातील हे सर्वात लहान लग्न असल्याचं बोललं जातंय. 

लोकांच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हे प्रकरण व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी  प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने महिलेने घेतलेल्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. जी व्यक्ती सुरुवातीपासूनच आपल्या जोडीदाराचा सन्मान करत नाही त्या व्यक्तीला सोडलेलंच बरं. एका युजरने म्हटलंय, बिना सन्मान विवाह कधीच यशस्वी होत नाही. 

सर्वात कमी वेळ टिकलेलं लग्न
जगातील सर्वात कमी वेळ टिकलेलं हे लग्न ठरलंय. याआधी 2004 मध्ये युनायटेड किंगडमध्ये एका जोडप्याने लग्नाच्या 90 मिनिटांनी घटस्फोट घेतला. द ग्रेटर मॅनचेस्टरमधल्या स्टॉकपोर्ट रजिस्टर ऑफिकमध्ये लग्नाच्या एक तासानंतर स्कॉट मॅकी आणि व्हिक्टोरिया एंडरसन यांनी नातं संपवलं. लग्न झाल्यानंतर स्कॉटने व्हिक्टोरियाला रागात अॅश ट्रे फेकून मारला होता. विशेष म्हणजे यानंतर व्हिक्टोरिया एंडरसनने घटस्फोटाची पार्टी करत आनंद व्यक्त केला होता.