जिओ विरुद्ध Airtel आणि Vodafone-Idea एकत्र येणार?

रिलायंस जिओला टक्कर देण्यासाठी कंपन्या एकवटल्या

Updated: Dec 6, 2018, 05:51 PM IST
जिओ विरुद्ध Airtel आणि Vodafone-Idea एकत्र येणार? title=

मुंबई : रिलायंस जिओला टक्कर देण्यासाठी आयडिया आणि वोडाफोन हे आधीच एकत्र आले असताना आता टेलीकॉम सेक्टरमध्ये असं महागठबंधन होतं आहे ज्यामुळे जिओला मोठं आव्हान दिलं जाणार आहे. भारती एयरटेल आणि वोडाफोन आयडिया हे जिओला टक्कर देण्यासाठी फायबर नेटवर्कवर करार करण्याचा विचार करत आहे. तिन्ही नेटवर्क एकत्र येऊन जिओला टक्कर देऊ शकतात.

नफा वाढवण्यावर जोर

एअरटेलच्या एका अधिकाऱ्याने इकनॉमिक टाईम्सला दिलेल्या माहितीत असं म्हटलं की, 'आम्हाली या करारामुळे आणि एकत्र येण्यामध्ये आनंद आहे. आम्ही वोडाफोन आयडिया सोबत मिळून काम करत आहोत.' जिओचे स्वस्त ऑफरमुळे अनेक कंपन्यांना नुकसान झालं आहे. वोडाफान आणि आयडिया याआधीच एकत्र आले आहेत.

भारती एअरटेल आता कस्टमर बेसच्या ऐवजी नफा वाढवण्यावर काम करत आहे. यासाठी त्यांनी प्रीमियम कस्टमरवर फोकस केलं आहे. दुसरीकडे रिलायंस जिओ देशभरात हायस्पीड फायबर नेटवर्कवर काम करत आहे. रिलायंस जिओ लवकरच गीगाफाइबर नावाने ब्रॉडबँड सर्विस सुरु करणार आहे. यानंतर मात्र जोरदार चुरस वाढणार आहे. रिलायंसने ब्रॉडबँड सेवाचे शुल्क जाहीर केले नसले तरी एअरटेल आणि वोडाफोन आयडिया फायबर नेटवर्क शेअर करत आहे. त्यामुळे जिओ विरुद्ध तिन्ही कंपन्या अशी कांटे की टक्कर असणार आहे.

ग्राहकांवर काय परिणाम ?

टेलीकॉम कंपन्यांच्या या स्पर्धेत ग्राहकांना मात्र फटका बसू शकतो. एअरटेलने आधीच घोषित केलं आहे की, त्यांची सेवा घेण्यासाठी महिन्याला कमीत कमी 35 रुपयांचं रिचार्ज करावे लागेल. म्हणजेच मोफत इनकमिंग सर्व्हिस देखील आता बंद होणार आहे. जिओ अनलिमिटेड कॉलिंगटी सर्विस तर देतो पण मोफत इनकमिंगची सुविधा येथे देखील नाही.