जबरदस्त ऑफर, विमान तिकीटावर मिळवा तब्बल ९०% डिस्काऊंट

सर्वसामान्यांना स्वस्तात विमान प्रवास करुन देण्यासाठी एअर एशिया इंडिया या विमान कंपनीनं एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार, ग्राहकांना फ्लाईट तिकीटवर तब्बल ९० टक्के डिस्काऊंट देण्यात येत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Mar 5, 2018, 09:34 PM IST
जबरदस्त ऑफर, विमान तिकीटावर मिळवा तब्बल ९०% डिस्काऊंट title=
Image source: Pixabay

मुंबई : सर्वसामान्यांना स्वस्तात विमान प्रवास करुन देण्यासाठी एअर एशिया इंडिया या विमान कंपनीनं एक जबरदस्त ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार, ग्राहकांना फ्लाईट तिकीटवर तब्बल ९० टक्के डिस्काऊंट देण्यात येत आहे.

त्यामुळे तुम्ही सुट्टीचा प्लॅन करत आहात तर तुमच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. मात्र, यासाठी तुम्हाला ११ मार्चपूर्वी तिकीट बूक करावं लागणार आहे. तसं केल्यास तुम्हाला तब्बल ९० टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. 

या तारखेला करु शकता प्रवास

लो कॉस्ट एअरलाईन्स कंपनी एअर एशियाने नवी ऑफर लॉन्च केली आहे. या ऑफर अंतर्गत कंपनीच्या अॅपवर तिकीट बुक करणाऱ्यांना प्रवाशांना ३ सप्टेंबर ते २८ मे २०१९ पर्यंत प्रवास करण्याची संधी आहे.

केवळ बिग मेंबर्ससाठीच

एअरलाईन्सने या ऑफरचं नाव Big loyalty असं ठेवलं आहे. यानुसार एअर एशियाच्या बिग मेंबर्स आयडीवरुन बिग पॉईंट्स मिळवू शकता आणि या ऑफरसाठी स्वत:ला सक्षम बनवू शकता. डिस्काऊंटसोबतच एअर एशिया आपल्या ग्राहकांना फ्री गिफ्ट्सही देत आहे. ही ऑफर केवळ बिग मेंबर्ससाठीच उपलब्ध आहे.

७९९ रुपयांपासून तिकीट दर

या ऑफरनुसार कमीत कमी तिकीटाचा दर ७९९ रुपयांपासून सुरु होतो तर अधिकाधिक ५५०० रुपये आहे. एअर एशियाच्या वेबसाईटवर दिल्ली वगळता सर्व प्रमुख विमानतळावर तिकीट दर दाखवण्यात आला आहे.