Budget 2023: मत्स्यव्यवसायाला नवी झळाळी मिळणार; लघु उद्योजकांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Budget 2023 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी संपूर्ण देशाकडूनच प्रचंड अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर असेल.   

Updated: Feb 1, 2023, 12:07 PM IST
Budget 2023: मत्स्यव्यवसायाला नवी झळाळी मिळणार; लघु उद्योजकांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा title=
Agriculture small scale entrepreneurs Budget 2023 Nirmala Sitharaman

Budget 2023 for small entrepreneurs : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली आणि अनेक महत्त्वपूर्ण क्षेत्रांना त्यांनी केंद्रस्थानी ठेवत मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये लघु उद्योजकांसाठी त्यांनी मोठी आर्थिक तरतूद करणार असल्याची घोषणा केली. 

काय म्हणाल्या अर्थमंत्री ? 

सरकारकडून PM Sampada Yojyna सारखीच आणखी एक योजना राबवण्यात येईल. ज्यामध्ये 6000 कोटी रुपयांची मोठी आर्थिक तरतूद केली जाईल. या योजनेतून मत्स्यव्यवसाय करणाऱ्यांना आणि देशातील लघु उद्योजकांना मोठा फायदा मिळणार आहे, असं अर्थमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आलं.

हेसुद्धा वाचा : Budget 2023 : देशाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

 

गेल्या बऱ्याच काळापासून देशभरातील विविध क्षेत्रांमध्ये मत्स्योत्पादन करणाऱ्या लघु उद्योजकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. मत्स्यविक्रीसाठीच्या जागांपासून ते अगदी या समुदाच्या इतरही बऱ्याच मागण्या दुर्लक्षित राहिल्या होत्या. पण, आता मात्र हे चित्र बदलणार आहे. 

कृषीविषयक स्टार्ट अप्सना प्राधान्य 

केंद्राकडून येत्या काळात कृषी क्षेत्राशी संबंधित लघु उद्योजक आणि त्यांच्या कल्पनांनी आकारास आलेल्या स्टार्ट अप्सना प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी तातडीनं आर्थिक मदत देण्यासाठीच्या योजनाही प्राधान्यानं राबवण्यात येणार आहेत. समाजातील काही महत्त्वाच्या घटकांना दृष्टीक्षेपात घेत अर्थमंत्र्यांनी 'सबका साथ, सबका प्रयास' हा नाराही दिला.