नवी दिल्ली : देशात पहिल्यांदाच डिझेलचा भाव ८१ रूपये प्रती लिटर वर गेला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी ७ जुलै रोजी डिझेल दरात २५ पैशांची वाढ केली होती. सलग पाच दिवस पेट्रोलचे दर स्थिर ठेवल्यानंतर सोमवारी दोन्ही इंधनाच्या किमती वाढवल्या आहेत. डिझेल ११ पैशांनी तर पेट्रोल ५ पैशांनी वाढला आहे. इधनांच्या पुन्हा होणाऱ्या वाढीमुळे ग्राहक त्रासले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिश्याला कात्री बसत आहे.
डिझेल दरवाढीने दिल्लीत डिझेलचा भाव पहिल्यांदाच ८१ रुपयांच्या वर गेला आहे. आज दिल्लीत डिझेल ८१.०५ प्रती लिटर प्रमाणे मिळत असून पेट्रोल ८०.४३ रुपये झाला आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा भाव ८७.१९ रूपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा भाव ७९.२७ रुपये आहे.
पेट्रोल-डिझेलचे दर SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी 6 वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.