हा व्हिडिओ पाहून लिफ्टचा वापरच सोडून द्याल...भयानक व्हिडिओ!

लिफ्टचा झालेला अपघात  पाहिलात का?

Updated: Oct 15, 2022, 12:36 AM IST
हा व्हिडिओ पाहून लिफ्टचा वापरच सोडून द्याल...भयानक  व्हिडिओ! title=

Viral Video : तुमच्या इमारतीत लिफ्ट असेल तर ही बातमी नीट पाहा. ही घटना हॉस्पिटलमध्ये घडली असली तरीही तुम्हाला सावध करणारी आहे. हॉस्पिटलमध्ये रुग्णाला स्ट्रेचरवरून लिफ्टमधून नेलं जात होतं. त्यावेळी अचानक लिफ्ट सुरू झाली आणि मग पुढे काय झालं. ते पाहून तुम्ही लिफ्टमध्ये जाण्यापूर्वी दहावेळा विचार कराल. 

व्हिडिओत एक व्यक्ती स्ट्रेचरवर असलेल्या रुग्णाला लिफ्टच्या आत नेत होती...स्ट्रेचर पूर्णपणे लिफ्टमध्ये शिरण्याच्या आतच लिफ्ट अचानक खाली येऊ लागली आणि इथे भयानक परिस्थिती निर्माण झाली. आता बघा किती मोठं संकट आलंय. या रुग्णाला स्ट्रेचरवरून लिफ्टमध्ये नेत असताना अचानक लिफ्ट खाली आली आणि सर्वांच्याच काळजात धस्स झालं. रुग्णाच्या नातेवाईकांची आणि वॉर्ड बॉयला काय करावं ते कळेना एक वॉर्ड बॉय लिफ्टमध्ये होता.

 

दुसरा वॉर्ड बॉय आणि नातेवाईक बाहेर होते आणि स्ट्रेचरवर असलेला रुग्ण मधोमध अडकला. लिफ्ट खाली जाऊ लागल्याने स्ट्रेचरवरील रुग्ण लिफ्टमध्ये पडला आणि लिफ्ट अडकली. पुढे काय झालं हे कळू शकलं नाही पण, या अपघातात रुग्ण आणि वॉर्डबॉय नक्कीच जखमी झाला असावा. हा व्हिडिओ कुठला आहे तेही समजलं नाहीये पण, लिफ्टचं वेळीच मेंटेनन्स आणि ऑडिट करणं गरजेचं आहे, नाहीतर दिरंगाईमुळे मोठी दुर्घटना घडू शकते.