Nitin Gadkari : मोठी घोषणा ! मुंबई नागपूरनंतर आता मुंबईहून 'या' शहराचं अंतरही होणार कमी

Delhi Mumbai Expressway : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रविवारी (11 डिसेंबर 2022) समृद्धी महामार्गाचं लोकापर्ण होणार आहे. नागपूर मुंबई नंतर मुंबईहून अजून एका शहराचं अंतर कमी होणार आहे.

Updated: Dec 11, 2022, 08:03 AM IST
Nitin Gadkari : मोठी घोषणा ! मुंबई नागपूरनंतर आता मुंबईहून 'या' शहराचं अंतरही होणार कमी title=
After Mumbai Nagpur now the distance between Mumbai Delhi will also decrease Nitin Gadkaris big announcement nmp

Nitin Gadkari Statement : समृद्धी महामार्गामुळे (Samruddhi Mahamarg) मुंबई नागपूर (Mumbai-Nagpur Samruddhi Expressway) अंतर 16 तासांवरुन 8 तासांवर येणार आहे. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अजून एका एक्स्प्रेसबद्दल मोठी घोषणा केली आहे. दिल्ली मुंबई एक्स्प्रेस वेबाबत (Delhi Mumbai Expressway) नितीन गडकरींनी मोठी घोषणा केली. 

नितीन गडकरींची घोषणा 

पाच ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवे बांधण्यात येणार आहे. ज्यामुळे मध्य प्रदेशला फायदा होईल, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. यापैकी एका दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचं बांधकाम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. या महामार्गाच्या निर्मितीमुळे दिल्ली ते मुंबई हा रस्ता मार्गाने अवघ्या 12 तासात प्रवास करता येणार आहे. नितीन गडकरी यांनी रीवा जिल्ह्यातील सात रस्ते प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करताना जिल्ह्यातील बारसैता गावात ही घोषणा केली.  (After Mumbai Nagpur now the distance between Mumbai Delhi will also decrease Nitin Gadkaris big announcement)

एक लाख कोटी रुपये खर्चाचा हा दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे 1,382 किलोमीटर लांबीचा आहे. नितीन गडकरी म्हणाले की, यासोबतच अटल प्रगती महामार्गाचं कामही लवकरच सुरू होणार आहे. हा महामार्ग पूर्वी चंबळ एक्स्प्रेस हायवे म्हणून ओळखला जात होता. ते पुढे म्हणाले की, 15,000 कोटी रुपये खर्चाचा हा अटल प्रगती मार्ग 415 किमी लांबीचा असेल आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या मागास भागातून जाईल. त्याची लांबी मध्य प्रदेशात 306 किमी, उत्तर प्रदेशात 37 किमी आणि राजस्थानमध्ये 72 किमी असेल.

या पाच द्रुतगती मार्गांजवळ लॉजिस्टिक पार्क आणि औद्योगिक क्षेत्र विकसित केले पाहिजेत. ते म्हणाले, इंदूर ते हैदराबाद असा 687 किमी लांबीचा नवीन सहा पदरी महामार्ग बांधला जाणार आहे, जो 2024 पर्यंत तयार होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एक मोठी आर्थिक शक्ती बनेल आणि त्यात मध्य प्रदेशचे मोठे योगदान असेल, असे ते म्हणाले.