मुंबई : तुम्ही अगदी बरोबर वाचताय की स्पेलिंग मिस्टेक नाही तर ही आहे #MenToo चळवळ. 'मी टू' ही चळवळ जगभर पसरत असताना आता 15 लोकांच्या समुहाने #MenToo या चळवळीला सुरूवात केली आहे. या चळवळी अंतर्गत सांगण्यात आलं की, महिलांकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल पुरूषांनी आता मोकळेपणाने बोलायचं आहे. या लोकांमध्ये फ्रान्समधील एक राजकीय व्यक्ती देखील सहभागी आहे. ज्यांना 2017 मध्ये लैंगिक अत्याचाराच्या अंतर्गत न्यायालयातून सोडण्यात आलं होतं.
#MenToo या चळवळीला शनिवारी चिल्ड्रंस राइट्स इनिशिएटिव फॉर शेअर्ड पेरेंटिंग (क्रिस्प) या संघटनेने सुरूवात केली. या संस्थेचे अध्यक्ष कुमार यांनी सांगितले की, हा समुह लैंगिक तटस्थ कायद्यांसाठी लढणार आहे. पुढे त्यांनी सांगितलं की, या #MeToo च्या अंतर्गत खोटे गुन्हे दाखल केलेल्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे.
#MeToo ही चळवळ अतिशय सुंदर आहे. पण या चळवळीअंतर्गत कुणा चुकीच्या व्यक्तीवर आरोप केले जाऊ नयेत. या कायद्याचा दुरूपयोग होऊ नये. या चळवळी अंतर्गत अनेक मान्यवरांनी कष्टाने कमावलेले नाव आता धुळीत मिसळले आहे. पुढे ते म्हणाले की, #MeToo चळवळीत लावलेले आरोप योग्य आहेत तर पीडितांनी सोशल मीडियावर बोलण्यापेक्षा कायद्याने बोलणं गरजेचं आहे. तशी कारवाई होणे गरजेची आहे. फ्रान्सचे पास्कल मजूरियर यांच्यावर आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. पण 2017 मध्ये न्यायालयाने त्यांना सोडून दिले.