Adani Port Share Price: जानेवारी महिन्यात आलेल्या हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर गौतम अदानी (Adani Share Hike) यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर राजकीय वातावरणात या मुद्द्यामुळे एक वेगळंच राजकारण पेटलं. परंतु त्यानंतरही शेअर मार्केटमध्ये अदानींच्या अदानी एन्टरप्राईझ, अदानी पोर्ट्स यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी चांगली कामगिरी दर्शवली होती. आता पुन्हा एकदा गौतम अदानीच्या अदानी पोर्ट्स (Adani Share Price) या कंपनीनं शेअर बाजारात चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळते आहे. बीएसईवर अदानींच्या अदानी पोर्ट्सनं चांगला परफॉमर्न्स दाखवला. हा शेअर 661.30 रूपयांवर ओपन झाला. 678.40 रूपयांच्या इंट्रा-डे ट्रेडिंगवर हा शेअर पोहचला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामध्ये 3 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे.
यासाठी अदानी पोर्ट्सची कंपनी 22 एप्रिल 2023 ला एक बोर्ड मीटिंग (Board of Directors Meeting) घेणार आहे. या कंपनीनं मागील वर्षी 5 रूपयांचा डेविडंट दिला होता. 2022 ते 2025 पर्यंत कॅपिटल एक्सपेंडिचर प्लॅनमध्ये बदल केले आहेत. यंदा अदानी पोर्ट्सचे शेअर्स विकत घेण्यासाठी ब्रोकरेज कंपन्याही मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांना सल्ला देत आहेत. हा शेअर 810 रूपयांपर्यंत पोहचू शकतो. पार्शल डेब्ट सिक्यूरिटीजच्या बायबॅकसाठी संमती मिळवण्यासाठी बोर्ड मीटिंग घेणार असल्याचे बुधवारी घोषित केले. (adani ports stock surged today nu 661.30 rupees on bse read the full details)
EBITDA वर निव्वळ कर्ज 2.54 टक्के कमी करण्यावर कंपनीचे लक्ष राहणार आहे. आर्थिक वर्ष 2022-24 दरम्यान EBITDA मध्ये दुहेरी अंकांमध्ये वाढ करण्याचे ठरविले आहे. CLSA बोकरेज फर्मनं बाय करण्याचेही रेटिंग दिले आहे. याची टार्गेट प्राईस ही 700 रूपयांवरून 790 रूपयांनी निश्चित केली आहे तर गोल्डमन सॅचनेही बाय रेटिंग दिले आहे ज्याची टार्गट प्राईस ही 810 रूपयांची आहे. तर मॉर्गन स्टॅनलीनं ओव्हरवेट रेटिंग दिली आहे. ज्याची टार्गेट प्राईस ही 690 रूपये आहे.
अदानींच्या हिंडनबर्गनं केलेल्या पोलखोलनंतर अदानींना हे सगळं झालेलं नुकसान सावरणं भागचं होतं त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्नही सुरू केले आहेत. त्यातून आता या रिपोर्ट्नंतर अदानी हे हळूहळू सावरताना दिसत आहेत. त्यामुळे आता या शेअरमुळेही अदानींना चांगला फायदा होऊ शकतो. तेव्हा या अदानी पोर्ट्सच्या शेअरमध्ये (Adani Ports) सगळेच गुंतवणूक करताना दिसत आहेत. अशावेळी गुंतवणूकदारांनीही चांगली कंबर कसली आहे. येत्या काही दिवसांमध्ये हा शेअर चांगलाच वाढतो आहे. तेव्हा येत्या काही काळात हा शेअर 800 च्याही वर जाण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. तेव्हा तुम्हीही योग्य मार्गदर्शनापरत्वे या शेअरचा विचार करू शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)