Activa 125 H-Smart : वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यात Honda Motorcycle and Scooter India ने H-Smart टेक्नॉलॉजी असलेली Activa 6G स्कूटर लाँच केली होती. यानंतर आता Honda कंपनीने 6G चे अपग्रेड व्हर्जन असलेली Activa 125 H-Smart ही स्कूटर लाँच केली आहे. ही स्कूटर चावी शिवाय स्टार्ट होणार आहे. लेटेस्ट फिचर्ससह कंपनीने यात रिमोट स्टार्टचे देखील ऑप्शन दिले आहे.
Activa H-Smart प्रमाणे, Activa 125 H-Smart ला अनेक वैशिष्ट्यांसह इलेक्ट्रॉनिक कीचे देखील फिचर देण्यात आले आहे. यामध्ये SmartFind फीचर देखील देण्यात आले आहे. या फिचरमुळे ब्लिंकिंग इंडिकेटरद्वारे तुम्हाला तुमची स्कूटर कुठे पार्क केलेय याबाबत महिती मिळेल. स्मार्टस्टार्ट फीचरमुळे तुम्हाला खिशात चावी घेऊन फिरायची गरज नाही. रिमोटच एक बटन दाबलं की स्कूटर स्टार्ट होईल.
Activa 125 हे लेटेस्ट व्हर्जन असून स्कूटर अधिक स्मार्ट झाली आहे. स्मार्ट-की फीचर मिळवणारी ही सेगमेंटमधील पहिली स्कूटर आहे. एच-स्मार्ट तंत्रज्ञानासह डिझाइन केलेली स्कूटर ड्रायव्हिंगचा देखील वेगळाच अनुभव देते. प्रवासादरम्यान स्कूटरच्या डिस्प्लेवर रिअल टाइम अपडेट मिळते. या स्कूटरचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे अँटी-थेफ्ट सिस्टम. स्कूटर पार्क केल्यानंतर दोन मीटर दूर जाताच, इमोबिलायझर फंक्शन Activate होते. यामुळे स्मार्ट-की लॉक फिचर ऑन होते. स्मार्ट कीमुळे स्कूटरची सीट, फ्यूएल कॅप, हँडल इत्यादी सहजपणे लॉक आणि अनलॉक करू शकता.